आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • So Far No Medication Has Been Authorized To Prevent Corona; There Are 22 Types Of Treatment In The World, Only Two Are Effective

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोरोनाला रोखण्यासाठी आतापर्यंत कोणतीही औषधी अधिकृत नाही; जगात 22 प्रकारचे उपचार सुरू, केवळ दोनच प्रभावी

जाेनाथम काेरम, कॅथरिन जे वू, कार्ल जिमरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेराेनाच्या उपचारातील या आहेत 8 प्रमुख औषधी

काेराेनाची आधुनिक चिकित्सा हा संपूर्ण जगासाठी आव्हानाचा विषय आहे. जगभरात उपचाराच्या पद्धती शाेधल्या जात आहेत, परंतु त्यात यश मिळालेले नाही. सध्या जगभरात किमान २२ प्रकारचे उपचार वापरले जात आहेत. परंतु, त्यापैकी केवळ २ काही प्रमाणात प्रभावी म्हणावे लागतील. आशा निर्माण हाेईल, अशा ऑषधीला अजूनपर्यंत तरी मंजुरी मिळाली नाही. यूएसएफडीएने अद्याप कोणत्याही ऑषधीला अधिकृत मानलेले नाही. परंतु काहींचा आणीबाणीच्या परिस्थितीत वापर केला जाऊ शकताे, असे स्पष्ट केले आहे. मात्र, डाॅक्टरांच्या सल्ल्याविना औषधी घेऊ नका, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

काेराेनाच्या उपचारातील ८ प्रमुख औषधी

रेमडेसिविर : इबाेला व हेपॅटायटिस सीवरील उपचारासाठी यास वापरण्यात आले. शरीरात नव्या विषाणूंच्या वाढीस मज्जाव करते. त्यामुळे काेराेना रुग्णांचा रुग्णालयातील १५ दिवसांचा मुक्काम ११ दिवसांवर आल्याचा दावा आहे.

हायड्राॅक्सिक्लाेराेक्विन : याचा वापर मलेरियाच्या उपचारात केला जाताे. हे औषधी हृदयासाठी मात्र हानिकारक ठरू शकते.

फेपिपिराविर : यामुळे काळ्या ज्वरावर उपचार केला जाताे. विषाणूची गुणसूत्रीय पातळीवर वाढ राेखण्यास मदत करते.

माॅल्न्यूपिराविर : ही फ्लूची अँटिव्हायरल औषधी आहे. पशूंमध्ये ही औषधी प्रभावी आढळली.

रिकाॅम्बिनेंट एसीई-२ : काेराेनाला पेशीपर्यंत जाण्यापासून राेखते. मात्र फार प्रभावी नाही.

इव्हरमेक्टिन : याद्वारे पॅरासाइट वाॅर्मचा उपचार केला जाताे. ऑस्ट्रेलियन संशोधकांच्या मते काेराेनाला पेशीपर्यंत जाण्यापासून राेखण्याचे काम करते.

ओलिएंड्रिन : टेक्सास मेडिकल काेरच्या संशोधकांनुसार या औषधीचा बाधित माकडांवर प्रभाव दिसून आला.

लाेपिनाविर व रिटाेनाविर : या औषधींच्या साह्याने एचआयव्ही बाधितांवर उपचार केला जाताे. काही ठिकाणी ताे यशस्वी ठरला. क्लिनिकल ट्रायलमध्ये ताे यशस्वी ठरला नाही.

इतर उपाय :

अँटिबाॅडी, प्लाझ्मा, स्टेम सेल्सशी संबंधितही उपचार करताहेत काेराेनाच्या उपचारासाठी व्हिटॅमिन सी, मिनरल सप्लिमेंट्स अँटिबाॅडी, प्लाझ्मा, ब्लड फिल्टरेशन सिस्टिम, स्टेम सेल्स, प्राेन पाेझिशनिंग, व्हंेंटिलेटर व रेस्पिरेटरी सपाेर्ट डिव्हाइसचा देखील वापर केला जात आहे. त्याशिवाय इंजेक्ट करणे, अल्ट्राव्हाॅयलेट लाइट व चांदीयुक्त पदार्थांवरील काेराेनाला नष्ट करण्याचे प्रयत्न झाले.