आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:सोशल मीडियावर दोन मिनिटांत इतकी निगेटिव्हिटी की तुमचा दिवस जातो वाया

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट फाेनवर सर्फिंग करताना दक्षता बाळगायला हवी. निगेटिव्ह साेशल मीडियावर दाेन िमनिटेदेखील घालवणे संपूर्ण दिवस वाया घालवण्यासारखे ठरू शकते. त्यामुळे तुमचा मूड दिवसभर खराब राहू शकताे. साेशल मीडियाबाबत अलीकडेच ब्रिटनच्या एसेक्स विद्यापीठातील संशाेधनातून एक तथ्य समाेर आले आहे. त्यानुसार काेराेना काळात निगेटिव्ह स्वरूपाच्या माहितीचा लाेकांच्या मानसिक आराेग्यावर विपरीत परिणाम दिसून आला आहे. ट्विटर व यू-ट्यूबवर लाेक निगेटिव्ह माहिती पाहून नैराश्यात गेले. येथे एक धक्कादायक असा ट्रेंडही पाहायला मिळाला.

या संशाेधनात लाेकांना काेराेनाशी संबंधित निगेटिव्ह स्टाेरी व पाॅझिटिव्ह स्टाेरी वाचायला दिली. तेव्हा निगेटिव्ह स्टाेरीमुळे ते अधिक नैराश्यात गेले. परंतु सकारात्मक माहिती वाचल्यानंतर त्यांचा मूडही चांगला झाला. या काळातील नकारात्मक बातम्यांचा नकारात्मक परिणाम मनावर दिसून आला. संशाेधन प्रकल्पाच्या प्रमुख डाॅ. कॅथरिन बुकानन म्हणाल्या, साेशल मीडियावर निगेटिव्ह साेशल मीडियाला डूम स्क्राेलिंग म्हटले जाते. त्यात युजर्सला स्टाेरीच्या माध्यमातून फीड दिला जाताे. त्यामुळे ते जास्तवेळपर्यंत स्मार्टफाेन किंवा लॅपटाॅपवर निगेटिव्ह स्टाेरी वाचतात. ते म्हणाले, साेशल मीडियावर निगेटिव्ह न्यूज फीडचा ट्रेंड वाढू लागला आहे. अशा प्रकारच्या न्यूज फीडच्या सत्यतेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित हाेतात. त्यामुळेच लाेक आॅनलाइन मिळेल ताे न्यूजफीड वाचतात.

बातम्या आणखी आहेत...