आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Social Therapy: Dance Or Drama Is The Medicine Of The Patient; Improving Health Through Social Interactions

मंडे गुड रीड:सामाजिक उपचार : नृत्य किंवा नाटक हे रुग्णांचे औषध; सामाजिक संबंधांमुळे आरोग्यात सुधारणा

मॅसाच्युसेट्स9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षात ९३ वर्षांच्या रूथ दाखल हाेणे ही नेहमीची बाब हाेती. त्यादरम्यान त्यांचे डॉक्टर, वृद्धारोगतज्ज्ञ डॉ. अर्देशीर हाश्मी यांना रूथने छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारी करूनही त्यांचा नेमका आजार समजला नाही. दरमहिन्याला किमान दोनदा रुथ यांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागायचे. सर्व चाचण्या हाेत आणि रिपोर्ट नाॅर्मल असत. रूथ स्वतः सांगतात की तिच्या छातीत तीव्र वेदना होत होत्या, परंतु आपत्कालीन क्रमांक ९११ डायल केल्यानंतर रुग्णवाहिका येईपर्यंत वेदना थांबलेल्या असत.

क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये जेरियाट्रिक इनोव्हेशनचे प्रमुख असलेले डॉ. हाश्मी स्पष्ट करतात की रूथसाठी अतिदक्षता विभागात कक्षात दाखल हाेणे सामान्य नव्हते. २०१५ पूर्वी त्यांची प्रकृती सामान्य होती. रूथशी अनेक वेळा प्रदीर्घ संभाषण केल्यानंतर डॉ. हाश्मी यांना कारण समजले. रूथचा नातू कॉलेजमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडला. तेव्हापासून छातीत तीव्र वेदना होण्याची ही समस्या २०१५ पासून सुरू झाल्याचे त्यांना कळाले. आता त्या एका मोठ्या घरात एकटीच राहत होत्या. परिसरातील डान्स स्टुडिओत त्यांना घेऊन जाणारं कुणी नव्हतं. रुथला वाटले की आपण घरात पायऱ्यांवरून पडले तर शेजाऱ्यालाही कळणार नाही. हा विचार येताच छातीत तीव्र वेदना होऊन पॅनिक अटॅक सुरू व्हायचा.

रूथ यांना वेदनाशामक आणि अँटीडिप्रेशन औषधाने बरे करणे शक्य नाही हे डॉ. हाश्मी यांना माहीत होते. म्हणून त्यांनी रूथ यांना वृद्धांची काळजी घेणाऱ्या व्यवस्थापकाकडे (वृद्धांची काळजी घेणारे स्वयंसेवक) जाण्याचा सल्ला दिला, जो नंतर त्यांना त्यांच्या क्षेत्रातील बॉलरूम डान्स स्टुडिओमध्ये घेऊन जाईल. स्टुडिओत खुर्चीवर बसून त्या संगीतावर नृत्य करायच्या तेव्हाही तो त्यांच्यासोबत असायचा. तो रूथ यांना तिच्या समुदायाशी आणि तिच्या आवडत्या संगीताशी पुन्हा कनेक्ट होण्याची संधी देत हाेता. हा उपचार सुरू होताच रूथचे पॅनिक अटॅक संपले. डॉ. हाश्मींनी जे केले ते आता वैद्यकीय व्यवसायात सामाजिक उपचार म्हणून ओळखले जाते. यामध्ये रुग्णाच्या स्थितीनुसार, डॉक्टर नृत्य, संगीत किंवा चित्रकला क्लासमध्ये सहभागी होण्यासाठी, सामाजिक कार्यासाठी किंवा निसर्ग सहलीसाठी स्वयंसेवक सहभागी हाेण्याचा उपचार सांगू शकतात. हे केवळ त्यांचे शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी केले जाते. अमेरिकन नागरिकांचे सरासरी वय वाढत आहे त्याबराेबरच जुनाट आजार आणि मानसिक आरोग्याशी संबंधित प्रकरणे वाढत आहेत. अशा परिस्थितीत, औषधे अपेक्षेप्रमाणे काम करू शकत नाहीत. कोरोनाच्या काळात वाढलेल्या एकाकीपणामुळे हे आणखी स्पष्टपणे सिद्ध झाले आहे. आरोग्याच्या सामाजिक घटकांवर कार्य करू शकणारे घटक फार कमी आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक उपचार हा प्रभावी ठरू शकतो.

असे सामाजिक उपचार अद्याप अधिकृतपणे मान्य केले गेलेले नाहीत. तथापि, उपचार इंग्लंडमध्ये अधिक चांगल्या प्रकारे दिले जाऊ शकतात. कारण राष्ट्रीय आरोग्यसेवा (NHS) ही राष्ट्रीय स्तरावर सामाजिक उपचारांसाठी निधी देणारी एकमेव प्रमुख आरोग्यसेवा प्रणाली आहे. डॉ. मायकेल डिक्सन, यूके कॉलेज ऑफ मेडिसिनचे अध्यक्ष आणि सामाजिक उपचार मोहिमेतील एक प्रणेते म्हणतात, ही व्याख्या विस्तृत ठेवली पाहिजे. ते म्हणतात, ‘जे रुग्ण आणि स्थानिक डॉक्टर अशा दाेघांच्याही मते परिस्थिती चांगली करण्यासाठी योग्य असेल, असे काेणतेही सामाजिक उपचार केले पाहिजेत’

डॉ. डिक्सन सांगतात की, यामध्ये स्थानिक डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. तो समाजाला चांगले ओळखतो. तो रुग्णाशी बोलण्यात वेळ आणि शक्ती घालवतो. त्याला रुग्णाच्या आवडी, स्रोत आणि प्रेरणांबद्दल माहिती असते. तो रुग्णासोबत त्यांच्या सोयीनुसार सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेली उपचार योजना विकसित करण्यासाठी काम करू शकतो. पारंपरिक डॉक्टरांना शक्य तितक्या लवकर रुग्णाचे निदान करून औषधे लिहून द्यायची असतात. स्थानिक डॉक्टर, ज्यांना डॉ. डिक्सन ‘लिंक वर्कर्स’ म्हणतात, ते रुग्णासाठी काय महत्त्वाचे आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक सामाजिक उपचारांमध्ये कोणत्या क्रिया सांगितल्या आहेत, याने फारसा फरक पडत नाही. कला, निसर्ग किंवा सामाजिक कार्य यांचा समावेश असलेली ही क्रिया असू शकते. आवश्यक असल्यास यामध्ये स्वयंपाक करणे शिकणे किंवा पाळीव श्वानाला दररोज फिरायला नेणेदेखील समाविष्ट असू शकते.

अमेरिका किंवा इतर देशांमध्ये सामाजिक उपचारपद्धती अजूनही दुर्मिळ आहे. अमेरिकेतील त्याच्या प्रमुख डॉ. डेब बुकीनो या आहेत, त्या पश्चिम मॅसॅच्युसेट्सच्या बर्कशायर येथील मॅकोनी पेडियाट्रिक्स येथील बालरोगतज्ज्ञ आहेत. डॉ. बुकीनो हे गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक उपचार करत आहेत. मास कल्चरल कौन्सिलने निधी दिलेल्या ‘कल्चर-आरएक्स’ मोहिमेत त्या सहभागी हाेत्या. पण ही मोहीम सुरू होताच कोरोनामुळे जग ठप्प झाले. तथापि, कोरोना काळात व त्यानंतर त्याची आवश्यकता जास्त जाणवू लागली. डॉ. बुकीनो या त्यांच्या रुग्णांमधून सर्वात जास्त फायदा हाेण्याची शक्यता असलेली मुले सामाजिक उपचारांसाठी निवडतात. ही अशी मुले आहेत जी त्यांचे वजन, चिंता किंवा नैराश्यामुळे कुठेही जात नाहीत. किंवा त्यांच्या कुटुंबात काही ना काही कारणास्तव समस्या आहेत ज्या त्यांना घरातच थांबण्यास भाग पाडतात. नर्स एड्रियन कॉन्क्लिन, ज्यांनी डॉ. बुकीनोसोबत काम केले होते, त्या सांगतात की, जिमी नावाचा ८ वर्षांचा मुलगा त्यांच्या क्लिनिकमध्ये आला होता. ताे एका वेदनादायी जन्मजात आजाराने त्रस्त होता. कुटुंबीयांच्या ड्रग्जच्या व्यसनामुळे तो आजीकडे राहत होता. मर्यादित उत्पन्न आणि आजारपणामुळे तो क्वचितच बाहेर पडत असे. शाळेतही त्याला मित्र नव्हते. नर्स कॉन्क्लिनने जिमीसाठी ‘द लिटल मर्मेड’ नाटकाची तिकिटे काढून दिली. हे नाटक त्याला त्याच्या मित्रासोबत बघायचं होतं. एका आठवड्यानंतर तिने जिमीच्या आजीला फॉलोअपसाठी बोलावले तेव्हा त्याचे परिणाम आश्चर्यकारक होते. दादीने सांगितले की जिमीने एक तासाचे नाटक पूर्ण आनंदाने पाहिले. ती खूश होती कारण जिमीने इतका वेळ पहिल्यांदाच इतका आनंदात घालवला होता. कॉन्क्लिन म्हणतात की थिएटर तिकीट ही खूप छोटी गोष्ट आहे. पण समस्यांनी ग्रासलेल्या कुटुंबासाठी ही मोठी गोष्ट होती. जिमीने पहिल्यांदाच पूर्ण तास आनंदात घालवला होता. डॉ. बुकीनो म्हणतात की, काही रुग्ण नियमित व्यायाम किंवा पौष्टिक आहार घेण्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्याकडे लक्ष देतात.

पण सामाजिक उपचार पद्धतीतील या घटकांमुळे या गोष्टीही सोप्या झाल्या आहेत. मात्र, तरीही सरकार किंवा विमा कंपन्यांना या उपचाराचा खर्च उचलण्यास परवानगी मिळणे हा मोठा अडथळा वाटताे. त्यासाठी पद्धतशीर संशोधन आवश्यक आहे आणि ते अद्याप झालेले नाही. जे संशोधन केले आहे ते सामाजिक उपचारांचा एकंदर परिणाम स्पष्ट करत नाही. प्लॉस मेडिसिनमध्ये प्रकाशित ३ लाख वृद्ध लोकांच्या २०१० मध्ये झालेल्या अभ्यासात असे आढळून आले की एकाकीपणामुळे मृत्यूचा धोका दिवसातून १५ सिगारेट पिण्याइतका वाढला. २०१५ मध्ये, लॅन्सेटने एक संशाेधन प्रकाशित केले ज्यामध्ये प्राथमिक स्मृतिभ्रंश असलेल्या १२०० प्रौढांना पारंपारिक आरोग्याचा सल्ला देण्यात आला आणि काहींना सामाजिक कार्य आणि नियमित व्यायाम करण्यास सांगण्यात आले. या गटावर त्याचे चांगले परिणाम दिसले, पण ज्यांनी पारंपारिक आरोग्य उपचार घेतले त्यांची प्रकृती खालावली. या प्रकारच्या उपचार पद्धतीचा फायदा कॅन्सरसारख्या आजारात दिसून आला आहे. परंतु अद्याप यावर कोणतेही पद्धतशीर संशोधन झाले नाही, ज्यामुळे वैद्यकीय समुदाय पूर्णपणे त्याचे समर्थन करत नाही. ताे मिळत नाही ताेपर्यंत सामाजिक उपचारपद्धती ही मर्यादितच राहिल.

बातम्या आणखी आहेत...