आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:शेजाऱ्यापाजाऱ्यांशी मिळून-मिसळून राहिल्यास दीर्घायुष्य लाभण्यात मदत, एकटेपणा दूर होतो, नैराश्यही घटते

न्यूयाॅर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणूस एक सामाजिक प्राणी आहे. लहानपणापासून आपण हे शिकत आलो आहोत, मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात उघड झाले की, शेजाऱ्यांशी मिळून मिसळून राहिल्यास दीर्घायुष्य लाभण्यात मदत मिळू शकते.

रटगर्स विदय्ापीठाच्या संशोधनानुसार, शेजाऱ्यांशी आपलेपणा जाणवल्याने चांगले आरोग्य लाभते. एकटे राहिल्याने आपल्या मेंदूवर नकारात्मक परिणाम पडतो. दुसरीकडे, शेजाऱ्यांशी बळकट संबंध एकटेपणाची भावना कमी करते. यामुळे मृत्यू दर कमी होतो. प्यू रिसर्च सेंटरनुसार, अमेरिकेत ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे सुमारे २७% लोक एकटे राहतात. यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. असे लोक अनेकदा हृदयविकार, नैराश्य, अकाली मृत्यू, स्मृतीभ्रंश आणि बॉडी क्लॉक बिघडण्यासारख्या आजाराला सामोरे जातात. हे सर्व परिणाम कमी करण्यासाठी संशोधन करण्यात आले. जे लोक एकटे राहतात व शेजाऱ्यांशी जास्त बोलत नाहीत त्यांचा मृत्यू दर इतरांसोबत राहणाऱ्या लोकांपेक्षा ४८.५% जास्त असतो. जे लोक एकटे राहतात, मात्र शेजाऱ्यांशी चांगले सबंध ठेवून आहेत,त्यांचा मृत्यू दर इतरांसोबत राहणाऱ्या लोकांसमान आढळला. रिसर्चनुसार, वेगवेगळे शेजारी आणि आसपासच्या लोकांवर संशोधन करून त्याच्याशी संबंधित लोकांचे आरोग्य तपासले.

मिळून-मिसळून राहिल्याने समाजात गरजेची जाणीव होते शेजाऱ्यांशी मिळून-मिसळून राहिल्याने लोकांना कुटुंबासोबत राहिल्याची जाणीव होते आणि त्यांना समाजाशी जोडल्यासारखे वाटते. यामुळे त्यांना समाजात त्यांची गरज असल्याचे जाणवते. लोकांना आपल्या आसपास होणारा बदल समजतो.

बातम्या आणखी आहेत...