आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यावर सलग 8 तास स्फोट:जपान, आग्नेय आशियात रेडिओ ब्लॅकआउट, सौर वादळ उद्या पृथ्वीला धडण्याची भीती

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून सूर्यावरील स्फोटांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी सूर्यावर सलग 8 तास स्फोट झाले. 'नासा'च्या सोलर डायनॅमिक्स व SOHO वेधशाळेने या खगोलीय घटनेची नोंद घेतली. या सूर्य स्फोटांचा प्रभाव जपान व दक्षिण-पूर्व आशियातील काही भागांत दिसून आला. स्फोटामुळे निर्माण झालेले सौर वादळ बुधवारी 15 जून रोजी पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे.

सौद वादळ म्हणजे काय?

सूर्यमालेवर परिणाम करण्याची क्षमता असलेल्या सोलार रेडिएशनला सौर वादळ म्हणतात.
सूर्यमालेवर परिणाम करण्याची क्षमता असलेल्या सोलार रेडिएशनला सौर वादळ म्हणतात.

सूर्यापासून निघणाऱ्या रेडिएशनमध्ये संपूर्ण सूर्यमालेवर परिणाम करण्याची क्षमता आहे. याचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला जबर फटका बसतो. विशेषतः याचा पृथ्वीभोवतीच्या वातावरणाच्या ऊर्जेवरही परिणाम होतो. सौर वादळे अनेक प्रकारची असू शकतात.

अनेक देशांत रेडिओ ब्लॅकआउट

शास्त्रज्ञांच्या मते, 'कालच्या सौर स्फोटामुळे जपान व दक्षिणपूर्व आशियातील अनेक देशांमध्ये शॉर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआउट झाले.' स्फोटातून बाहेर पडणाऱ्या सौर ज्वाळांमुळे असे घडते. स्पेस वेदर वेबसाइटनुसार, 'सौर ज्वाळांतून प्लाझ्मा व चुंबकीय क्षेत्रही बाहेर पडले. प्लाझ्माचा वेग ताशी लाखो किलोमीटर होता.'

उद्या भूचुंबकीय वादळ धडकू शकते

उद्या येणारे सौर वादळ कमकुवत ते मध्यम असू शकते.
उद्या येणारे सौर वादळ कमकुवत ते मध्यम असू शकते.

अमेरिकेच्या 'नॅशनल ओशनिक अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन'ने (एनओएए) एक इशारा जारी केला आहे. त्यात त्यांनी पुढील एका आठवड्यात पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हादरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. येथे G-1 आणि G-2 वर्गाची भूचुंबकीय वादळे येऊ शकतात. त्यांना कमकुवत ते मध्यम वादळे म्हणून ओळखले जाते.

भारताच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्स'च्या माहितीनुसार, 'सौद वादळ 15 जून रोजी 645 ते 922 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव काही दिवस टिकेल.'

बातम्या आणखी आहेत...