आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:अमेरिकेतील काही कंपन्यांनी सुरू केली स्वस्त औषधांची विक्री

अमेरिकाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत औषधे खूप महाग आहे. २०१९ मध्ये औषधांवर दरडोई सरासरी खर्च ८८,१८४ रु. होता. इतर श्रीमंत देशांच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. मात्र, ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. मार्क क्युबन यांच्या कॉस्ट प्लस औषध कंपनीने व्हायग्रासह ८७ औषधांच्या किमती कमी केल्या. क्युबन कंपनीच्या सरकारी आरोग्य विमा योजनेंतर्गत २०२० मध्ये वृद्धांसाठीच्या औषधांचा खर्च ७५ हजार कोटींऐवजी २८ हजार कोटी असू शकतो, असे एका नव्या अध्ययनातून कळले आहे.

क्युबन यांनी वर्षअखेरीस हजारो स्वस्त पेटंटमुक्त औषधे उपलब्ध करण्याची योजना आखली आहे. हृदयविकार, कर्करोग आणि इतर आजारांवर परवडणाऱ्या किमतीत औषधे उपलब्ध करून दिल्याबद्दल मोठ्या संख्येने लोकांनी क्युबनचे आभार मानले आहेत. क्युबन एकटे नाहीत. सिविका स्क्रिप्ट कंपनीही जेनेरिक औषधांच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. २३ हजार रुपयांच्या ब्रँडेड औषधाऐवजी ती जेनेरिक इन्सुलिनची एक कुपी २३०० रुपयांना देणार आहेत. ईक्यूआरएक्स आणि चेकपॉइंट थेराप्युटिक्स कंपन्या मोठ्या फार्मा कंपन्यांच्या महागड्या औषधांपेक्षा स्वस्त नवीन कर्करोग आणि प्रतिकारक औषधे विकसित करत आहेत.

अमेरिकेतील अत्यंत महागड्या औषधांच्या बाजारपेठेत किंमत कमी होण्याच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. पेटंटमुक्त औषधांना सरकारी नियामक एजन्सीद्वारे कॉपी, उत्पादित, चाचणी आणि मंजूर होण्यासाठी बराच वेळ लागतो. सिविका स्क्रिप्टने इन्सुलिन बनवण्यासाठी खूप खर्च केला आहे. खूप आधी खर्च वसूल केलेल्या बड्या कंपन्या आता त्यांच्या ब्रँडेड उत्पादनांच्या किमती कमी करून सिविकासाठी अडचणी निर्माण करू शकतात.