आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानातील शालेय पुस्तकातील सामाजिक कार्यकर्ता व मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या मलाला युसूफझाईवरील धडा हटवण्याची मागणी वाढली आहे. त्यावरून पाकिस्तानात बहुसंख्यांकांची कशा प्रकारची मानसिकता आहे, याचा अंदाज लागू शकताे. पाकिस्तानातील पंजाब राज्यातील हे वास्तव आहे. तेथील शालेय अभ्यासक्रमात मलालावरील धड्याचा समावेश आहे. पाकिस्तानातील प्रभावी व्यक्ती अशा आशयाच्या धड्यात मलालाबद्दल मुलांना शिकवले जाते. या पुस्तकात मलालास अल्लामा इक्बाल, चाैधरी रहमत अली, लियाकत अली खान, माेहंमद अली जिन्ना, बेगम राणा लियाकत अली व अब्दुल सत्तार यांच्या रांगेत दाखवण्यात आले. त्यावरून लाेकांमध्ये नाराजी आहे. ते मलालाचा धडा हटवण्याची मागणी करू लागले आहेत.
दुसरा वर्ग मात्र त्यास विराेध करत आहे. मलालाचा धडा हटवून काय लादेनचे चरित्र वाचण्यास पसंती द्यायची का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सिंध प्रांतातील सरकारने एका सरकारी शाळेचे नाव मलालाच्या नावावर ठेवण्याची घाेषणा केली हाेती. सेठ कुँवरजी खिमची लाेहाना गुजरात स्कूल असे या शाळेचे मूळ नाव आहे. ते बदलून मलाला सरकारी गर्ल्स सेकंडरी स्कूल असे करण्यात आले आहे. ही शाळा कराचीच्या मिशन राेडवर आहे. परंतु नाव बदलताच गदाराेळ सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी नाव पुन्हा बदलण्यास तीव्र विराेध केला आहे. सरकारने शहरातील इतिहासाला नष्ट करू नये, असे लाेकांचे म्हणणे आहे.
आम्हाला इतिहास पुसायचा नाही, मलालाच्या वडिलांची प्रतिक्रिया
शाळेचे नाव बदलण्यावरून मलालाच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे. मलालाच्या वडिलांनी लाेकांच्या मागणीचे समर्थन केले आहे. आपण इतिहास किंवा इतरांची नावे पुसून टाकू नयेत. सेठ कुँवरजी खिमजी लाेहाना यांचे नाव हटवून मलालाचे नाव शाळेला देणे याेग्य हाेणार नाही. पाकिस्तानात आता काही लाेक पुस्तकातून मलालाबद्दल शिकवले जात आहे. ही बाब चांगली आहे. ते हटवण्याची का बरे मागणी केली जात आहे? असा प्रश्न त्यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.