आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचे पुस्तक ‘ए प्रॉमिस्ड लँड’एका आठवड्यानंतर दुसऱ्यांदा चर्चेत आहे. पुस्तकाच्या एका भागामध्ये सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा उल्लेख आहे. ओबामांनुसार, सोनिया गांधींनी मनमोहन सिंह यांना यासाठी पंतप्रधान बनवले, कारण त्यांना वाटत होते की, राहुल गांधींसाठी भविष्यात कोणतेही आव्हान उभे राहू नये.
चार दिवसांपूर्वी या पुस्तकाचा अजून एक भाग समोर आला होता. यामध्ये ओबामा म्हणाले होते की, 'राहुल अशा विद्यार्थ्यासारखे आहे, जो शिक्षकाला इम्प्रेस करण्यासाठी उत्सुक असतो, पण विषयाचे मास्टर होण्याची योग्यता किंवा महत्वाकांक्षा त्यांच्यात नाही. ही राहुल गांधींची कमजोरी आहे.' ओबामा जेव्हा सत्तेत होते, तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. ओबामा अखेरच्या वेळी डिसेंबर 2017 मध्ये भारतात आले होते, तेव्हा राहुल त्यांना भेटले होते. राहुल गांधी ट्विट करत म्हणाले होते की, ओबामांसोबतची भेट शानदार राहिली.
भारताचा आर्थिक विकास
ओबामांनुसार, 1990 च्या दशकात भारत मार्केट बेस्ड अर्थव्यवस्था होती. मिडल क्लास तेजीने ग्रोथ करत होते. यामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी लोकांचा जीवनस्तर सुधारण्यासाठी खूप मेहनत आणि प्रयत्न केले. त्यांच्याविषयी बोलले जाते की, ते भ्रष्ट नव्हते.
ओबामांच्या मते, 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर मनमोहन यांच्यावर पाकिस्तानविरोधात हल्ल्यासाठीचा दबाव होता. त्यांनी असे केले नाही. मात्र त्यांना राजकीयदृष्ट्या याचा त्रास सहन करावा लागला. भारतीय जनता पक्ष मजबूत झाला. ओबामांनुसार, भारताच्या राजकारणावर सध्याही धर्म आणि जातीचा प्रभाव आहे. मात्र हे म्हणणे उचित होणार नाही की, याच कारणामुळे मनमोहन सिंह यांना पंतप्रधान बनवण्यात आले. यामागे वेगळे कारण होते.
सोनियांच्या हेतूवर प्रश्न
ओबामा लिहितात - अनेक राजकीय तज्ज्ञांचे मत आहे की सोनिया यांनी मनमोहन यांना खूप विचार करुन पंतप्रधान केले. सिंग यांना कोणताही राजकीय आधार नव्हता. सत्य काहीतरी वेगळेच आहे. खरे तर, सोनियांना आपला 40 वर्षीय मुलगा राहुल गांधी यांच्या राजकीय भवितव्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये असे वाटत होते. त्या राहुल यांना काँग्रेसचे नेतृत्त्व सोपवण्यासाठी तयार करत होत्या.
...त्या डिनरची गोष्ट
ओबामांनी एका डिनरचा उल्लेख केला आहे. ओबामांच्या सन्मानासाठी मनमोहन सिंह यांनी डिनरचे आयोजन केले होते. सोनिया आणि राहुल गांधी यांमध्ये सहभागी होती. ओबामा लिहितात - सोनिया बोलण्यापेक्षा ऐकणे जास्त पसंत करत होत्या. जसे पॉलिसी मॅटरविषयी बोलले जात गोते तेव्हा त्या आपले बोलणे राहुल गांधींकडे वळवायच्या. आता माझ्यासमोर स्पष्ट झाले होते की, सोनिया इंटेलिजेंट आहेत आणि हे दाखवूनही देतात. राहुल स्मार्त आणि उत्साहित दिसले होते. त्यांनी माझ्या 2008 च्या इलेक्शन कॅम्पेनविषयीही प्रश्न केले.
ओबामांनी पुढे लिहिले - मला माहिती नव्हते की, पदावरुन हटवल्यानंतर मनमोहन सिंह यांच्यासोबत काय होईल. त्या सत्ता राहुल गांधींना सोपवून देतील का? म्हणजे तेच करतील जे राहुलसाठी सोनियांनी ठरवले होते. की, काँग्रेसच्या दबावाला भाजप आव्हान देईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.