आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशिंग्टन:फेसबुकच्या माजी कर्मचाऱ्याचा पलटवार; म्हणाली, वास्तव सांगणारच, मला ४८ लाख रुपये देऊन गप्प करण्याचा प्रयत्न

वॉशिंग्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झांगचा आरोप- निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या फेक अकाउंटवर कंपनी कठोर नाही

फेसबुकमधून हकालपट्टी झालेली डेटा सायंटिस्ट सोफी झांगची वेबसाइट अचानक बंद पाडण्यात आली. तिने फेसबुकविरुद्ध पोस्ट लिहिली होती. ती हटवण्यासाठी फेसबुककडून दबाव टाकला जात होता. तिने कंपनीतील शेवटच्या दिवशी लिहिलेल्या ८ हजार शब्दांच्या मेमोत अनेक आरोप केले होते. जसे की, फेसबुक निवडणुकींवर प्रभाव टाकणाऱ्या फेक अकाउंटची ओळख व त्यांच्यावर कारवाईबाबत सुस्त आहे. कंपनीने २५ देशांच्या नेत्यांना प्लॅटफॉर्मचा राजकीय गैरवापर व लोकांची दिशाभूल करण्याची मुभा दिली आहे. फेसबुकचे खरे चारित्र्य दाखवल्याबद्दल आलेल्या अडचणी झांगच्या शब्दांत...

विशिष्ट पक्षांना फायदा मिळवून देण्यासाठी अनेक देशांत फेसबुकचा गैरवापर करण्यात आला
मी २०१८ मध्ये फेसबुक जॉइन केले. ३ वर्षांच्या नोकरीत मी विदेशी नागरिकांद्वारे नागरिकत्वावरून लोकांची दिशाभूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आमच्या प्लॅटफाॅर्मचा दुरुपयोग करताना पाहिले. कंपनीने राष्ट्रप्रमुखांना प्रभावित करणारे निर्णय घेतले. जागतिक पातळीवर अनेक प्रमुख राजकीय नेत्यांविरुद्ध सोशल मीडियावर माेहिमा राबवल्या. ज्यामुळे विशिष्ट पक्षांचा फायदा झाला. जगातील टाॅप नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी फेक अकाउंटचा वापर केला. लोकांची दिशाभूल करून टीकाकारांना झटकण्याचे प्रयत्न करण्यात आले. मी माझा संपूर्ण वेळ जगभरातील निकालांत हेराफेरी करू शकणाऱ्या बनावट खात्यांची ओळख करण्यात घालवला. ब्राझील निवडणुकीदरम्यान लाखो बनावट पोस्ट झाल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. अझरबैजान सरकारने विरोधकांविरुद्ध हजारे फेक पेजेसचा वापर केला. स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाला कोरोना सहकार्यात्मक हेराफेरीने फायदा झाला. अफगाणिस्तान, बोलिव्हिया, मेक्सिको अशा सर्वच ठिकाणी हे प्रकार घडले.

वारंवार इशारा देऊनही कंपनीने काहीच केले नाही. मी सुरुवातीपासूनच एकटीने ही जबाबदारी पेलली होती. जे घडतंय ते चूक आहे, हे सर्वांनाच माहीत होते. मात्र कुणीही समस्येवर तोडगा काढायला तयार नव्हते. हा मेमो कंपनी नेतृत्वावर दबाव टाकण्याचा शेवटची संधी होती. मला गप्प करण्यासाठी ४८ लाखांच्या सेव्हरन्स पॅकेजचीही (हटवण्याबाबत) ऑफर करण्यात आली. मात्र मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी तडजोड केली नाही. मेमोत लिहिले होते अन् आजही सांगते... पातक माझ्या माथीही आहे, मात्र इथपर्यंत येऊन हात झटकणे स्वत:शी विश्वासघात केल्यासारखे असेल. २०२० मध्ये मला अपात्र ठरवून काढले. आता मेमो हटवून कंपनी स्वत:ला निष्कलंक दाखवण्याचा बनाव करत आहे. - सोफी झांग

बातम्या आणखी आहेत...