आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • South Korea Able To Destroy Kim's Plans In 20 Seconds; Korea Prepares For US Missile Launch | Maratjhi News

युद्धसज्ज द. कोरिया:किमचे मनसुबे 20 सेकंदांत नष्ट करण्यास दक्षिण कोरिया सक्षम ; काेरियाची अमेरिकन क्षेपणास्त्राने तयारी

सेऊलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व आशियात तणाव वाढू लागला आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन शेजारी राष्ट्र दक्षिण कोरियाला आपल्या अण्वस्त्रसज्जतेच्या जोरावर धमकावत आहेत. किम यांनी पाच दिवसांत दक्षिण कोरियाच्या सरहद्दीत पाच आयबीएम क्षेपणास्त्रे डागली. ७० वर्षांत पहिल्यांदाच उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या सैन्याच्या दिशेने अशा कारवाईची हिंमत केली आहे. परंतु दक्षिण कोरियाच्या शस्त्रागारात अमेरिकन क्षेपणास्त्रांसह बलाढ्य शस्त्र प्रणाली आहे. यालाच दक्षिण कोरियाचे सुरक्षा कवच मानले जाते.

त्यामुळे काेरियातील लोकसंख्येला लक्ष्य करण्यासाठी किम यांनी क्षेपणास्त्र डागल्यास त्याला केवळ २० सेकंदांत नष्ट करण्याची क्षमता दक्षिण कोरियाकडे आहे. किम उन यांना कोरियाच्या या क्षमतेची कल्पना आहे. त्यामुळे नजीकच्या काळात अण्वस्त्र चाचणीची योजना आखण्याचे किम टाळत आहेत. कारण या वेळी अशा पद्धतीची चाचणी घेतल्यास दक्षिण कोरिया त्यास चोख प्रत्युत्तर देऊ शकते, हे किम यांना ठाऊक आहे. त्याचबरोबर दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाची राजधानी प्योगाँगमधील प्रमुख भाग क्षेपणास्त्राच्या रडारवर ठेवली आहेत. या भागात हुकूमशहा किम व लष्करी अधिकाऱ्यांचे ठिकाणे आहेत.

द. कोरियाचे संरक्षण बजेट १० पटीने जास्त अाण्विक शक्ती नसतानाही द. कोरियाचे संरक्षण बजेट उत्तर काेरियाच्या तुलनेत १० पट जास्त आहे. दरवर्षी ३.० लाख कोटी खर्च .

थॉड सिस्टिम दक्षिण कोरियाकडे. हे सर्वात बळकट शस्त्रे. कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्याची १०० टक्के अचूक क्षमता यातून मिळते.

सागरी शक्ती - द. कोरियाकडे चार आण्विक पाणबुड्या. जगात सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या पाणबुड्यांतून करण्यात आला आहे.

दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था गेमचेंजर ६० पट मोठी आहे दक्षिण कोरियाची १२० लाख कोटींची अर्थव्यवस्था. उ. कोरियाची केवळ २ लाख कोटी. द. कोरिया आर्थिक महाशक्ती.

चांगला मित्र द. कोरियाकडे मित्र देशांच्या यादीत आर्थिकदृष्ट्या संपन्न देश, उत्तर कोरियाकडे चीन, रशिया व हुकूमशाही असलेले लहान देश.

सॉफ्ट पॉवर - द. कोरियातील १२ लाख लोक अमेरिकेत वास्तव्याला. इतर देशांत चांगली संख्या. उ. कोरियाची परदेशातील संख्याही कमी

बातम्या आणखी आहेत...