आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

द. कोरियात तत्परतेचे उदाहरण:33 मजली इमारतीमध्ये आग; पाचच मिनिटांत 1000 जवान दाखल, 159 जणांना वाचवले

सेऊल20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण काेरियाच्या उल्सान शहरात गुरुवारी रात्री ११ वाजता ३३ मजली इमारतीत भयंकर आग लागली. पाहता पाहता आग ८ व्या मजल्यापर्यंत पोहोचली. मात्र, अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे सर्व १५९ जणांना वाचवण्यात यश आले. १,००० अग्निशमन जवान आग लागल्याच्या ५ मिनिटांतच घटनास्थळी पोहोचले होते. प्राथमिक तपासानुसार, आग इमारतीतच्या बाहेर लावलेल्या इन्सुलेशन मटेरियलमुळे पसरली होती. काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळामुळे वाहत असलेल्या वेगवान वाऱ्यामुळे आग भडकली.

सर्वांना असे वाचवले
77 लाेकांना इमारतीच्या छतावरून केले एअरलिफ्ट
82 लाेकांना तत्काळ इमारतीच्या खालून काढण्यात आले.
91 लाेक रुग्णालयात. त्यांना किरकोळ जखमा झाल्या.
2 तासांत आगीवर नियंत्रण