आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दक्षिण कोरिया : कुरुळ्या केसासोबत वावरताना कुणी असभ्य समजावे ही लोकभावना झिडकारत रोलर्ससह फिरताहेत तरुणी

दैनिक भास्करशी विशेष करारांतर्गत | जिन यू यंग13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • समाजाचे हास्यास्पद मापदंड आणि जाचक दृष्टिकोनाचा तरुणाईकडून अनोखा विरोध

काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या एका मेट्रोतील कोचमध्ये सात मुली प्रवास करत होत्या. उर्वरित प्रवाशांप्रमाणे त्यांनी जॅकेट आणि विंड ब्रेकर्स घातले होते. मात्र, त्यांच्याकडील एक अॅक्सेसरी सर्वात वेगळी होती. ती होती त्यांच्या केसांना लावलेले कर्लर (रोलर). जुन्या काळातील समजली जाणारी ही अॅक्सेसरी सध्या सेऊल आणि देशाच्या सर्वात मोठ्या शहरांतील मुली कॅफे, रेस्तराँ, मेट्रो आणि जवळपास सर्व प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी वापरताना दिसते.

२३ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी जंग यू वॉन रोज कर्लरचा वापर करते. ती सांगते की, वर्गात, एखाद्या कार्यक्रमात किंवा मीटिंगला जाण्याआधी परफेक्ट कर्ल कायम ठेवण्यासाठी ती असे करते. मात्र, तिची आई तिला रोखते. इतरांना असे चुकीचे वाटेल अशी तिला भीती असते.

वॉन म्हणाली, आपण लोकांची चिंता का करायची? कुणी केसांच्या स्टाइलवरून आम्हाला जज करावे हे मान्य नाही. ज्यांच्यासमोर आपण चांगले दिसू असे वाटते त्यांचाच विचार केला पाहिजे. द. कोरियात कुरुळे केस ठेवणे असभ्य मानले जाते. त्यामुळे केस सरळ ठेवण्यावर भर दिला जातो. मात्र, तरुण पिढी हे सामाजिक बंधन मान्य करण्यास तयार नाही. लोक काय म्हणतील याचा त्यांना फरक पडत नाही. त्या स्वतंत्र राहू इच्छितात.

वॉन आणि तिच्यासारख्या अनेक मुली कर्लर्सना अशी अॅक्सेसरी मानतात, जी दिवसभराच्या प्रवासादरम्यान आपला लूक चांगला ठेवण्यात फायदेशीर ठरते. द.काेरियात कठोर सौंदर्य मानके आणि लिंगभेदाचा विरोध आधीही झाला आहे. मीटू मोहिमेनंतर देशात महिलांनी एस्केप द कॉर्सेट मोहीम सुरू झाली होती. जाचक विचाराला विरोध प्रकट करण्यासाठी त्यांनी मेकअप सोडून बाऊल कट हेअर स्टाइल सुरू केली होती. काळ बदलला आहे, आता महिलांवर दबाव नको, असे २४ वर्षीय संशोधक किम डोंग वॉनचे मत आहे.

ज्येष्ठ महिला आणि दिग्गजही महिलांना सूट देण्याचे समर्थन करताहेत

५४ वर्षीय किम जी-इन आणि अशा अनेक महिला याकडे एक सुखद बदल म्हणून पाहत आहेत. महिलांना सार्वजनिक ठिकाणी सौंदर्य आणि लैंगिक दृष्टिकोनातील अपेक्षांचे पालन न करता त्यांच्या मनाने राहण्याची सूट दिली पाहिजे. इन म्हणतात, त्यांच्या काळात कर्लर्स वा रोलर घेऊन बाहेर जाण्याची कल्पनाही नव्हती. दक्षिण कोरियातील अनेक दिग्गज या ट्रेंडचे समर्थन करत सोशल मीडियावर छायाचित्र पोस्ट करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...