आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:दक्षिण कोरियात विक्रमी दहा लाख रुग्ण, नव्या लाटेचा तज्ज्ञांचा इशारा

द न्युयॉर्क टाइम्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सबव्हेरिएंट BA.2 वेगाने फैलावतोय, युरोपात रुग्णांत वाढ

कोरोना विषाणू पुन्हा पाय पसरू लागला आहे. चीनमध्ये २०२० नंतर संसर्गानंतर वाढत्या रुग्णसंख्येमुळे बारा शहरांत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. कोरोनाचा नवा हॉटस्पॉट म्हणून दक्षिण कोरिया उदयाला आले आहे. तेथे दोन दिवसांत दहा लाखांवर रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६.२ लाख रुग्ण चोवीस तासांतील असल्याची नोंद झाली आहे. वाढती संख्या लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने अशा देशांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. ही मोठ्या संकटाची सुरुवात ठरू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. ओमायक्रॉनचा तीव्र संसर्ग करणारा बीए.२ युरोपात वेगाने पसरू लागला आहे. याच महिन्यात या विषाणूने दुसऱ्यांदा संसर्गाचा विळखा घातला आहे. तेथूनच तो वेगाने अमेरिकेतही पोहोचला होता. अशा स्थितीत अमेरिकेने देखील सतर्क राहण्याची गरज आहे.

वेगाने संसर्ग, युरोपात
१ लाख लोकांमागे ९५

युरोपात बीए.२ या विषाणूचा संसर्ग लाखामागे ९५ जणांना आहे. ३ मार्च रोजी ही संख्या ८७ वर होती. म्हणजेच जगातील इतर भागांच्या तुलनेत युरोपातील संसर्गाचा वेग जास्त आहे. न्यूयॉक टाइम्सनुसार अमेरिकेत एक लाख लोकांमागे दहा बाधित आढळून येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...