आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळ भ्रमंती:अब्जाधीश ब्रॅन्सन आज जाणार अवकाश भ्रमंतीवर, 6 प्रवाशांत भारताची सिरिशाही

न्यूयाॅर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हर्जिन गॅलेक्टिकची पहिली अंतराळ यात्रा

ब्रिटिश उद्योगपती व व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन ११ जुलै रोजी मिशन स्पेशालिस्ट स्पेसशिप-२ युनिटीवर स्वार होत अंतराळ भ्रमंतीवर रवाना होतील. यानाचा हा प्रवास यशस्वी झाल्यास पृथ्वीच्या कक्षेतील पर्यटनाचा नवा मार्ग खुला होईल. या मोहिमेत भारतवंशीय सिरिशादेखील सहभागी असून कल्पना चावला, सुनीता विल्यम्सनंतर अशा अवकाशात जाणारी ती तिसरी महिला ठरेल. या उड्डाणात ब्रॅन्सन व उर्वरित प्रवाशांना सुमारे ४ मिनिटांपर्यंत भाररहित स्थिती अनुभवता येऊ शकेल. ते अंतराळात पृथ्वीला पाहू शकतील. त्यानंतर स्पेसपोर्टच्या (न्यू मेक्सिको) धावपट्टीवर ते उतरवले जाईल.

कोण-कोण जाणार भ्रमंतीवर?
ब्रॅन्सन यांच्यासोबत व्हर्जिन गॅलेक्टिकचे प्रमुख अंतराळवीर बेथ मोजेज, कंपनीचे लीड ऑपरेशन्स इंजिनिअर कोलिन बेनेट, सरकारी व्यवहार व संशोधन विभागातील उपाध्यक्ष सिरिशा बांडला यांच्यासह ६ यात्रेकरू असतील. यानात भ्रमंतीसाठी चार पायलट डेव्ह मॅके, मिशेल मशुसी, केली लॅटिमेर आणि सीजे स्टर्कोही आहेत. सोबत एकूण २२ यान कर्मचाऱ्यांचे दलही असेल.

उड्डाण कार्यक्रम
कोठून : स्पेसपोर्ट अमेरिका, न्यू मेक्सिको

केव्हा : ११ जुलै, रविवार
सायं. ६ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१५ किमीनंतर रॉकेटपासून युनिटी विलग होईल
व्हीएसएस युनिटी कोणत्याही रॉकेटचा भाग नाही. ते कंपनीच्या व्हीएमएस ईव्हवर स्वार होऊन झेपावेल. १४ किमी उंचीवर गेल्यानंतर युनिटी विलग होईल . इंजिन मॅक-३ (ताशी ३७०४.४ किमी) वेगाने ९०-१०० किमी उंचीपर्यंत जाईल.

बातम्या आणखी आहेत...