आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज परत येईल स्पेसएक्स ड्रॅगन:45 वर्षानंतर समुद्रात होईल अमेरिकन स्पेसशिपची लँडिंग, 9 वर्षांपूर्वी स्पेसमध्ये पाठवलेल्या फ्लॅगसोबत 63 दिवसानंतर दोन अंतराळवीरांची वापसी

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ड्रॅगन कॅप्सूलने आयएसएसला गेलेल्या रॉबर्ट बेनकेन आणि डगलस हर्लेने 100 तास अंतराळात काम केले

अमेरिकन अंतराळ कंपनी स्पेसएक्सचा क्रू ड्रॅगन कॅप्सूल इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस)वरुन पृथ्वीकडे रवाना झाला आहे. नासाने एक व्हिडिओ जारी करुन याची माहिती दिली. व्हिडिओमध्ये स्पेसएक्स आयएसएसमधून निघताना दिसत आहे. फ्लोरिडामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे, तरीदेखील भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी 5 वाजता आयएसएसमधून रवाना झाला. हे कॅप्सूनल रविवारी रात्री 12 वाजता पृथ्वीवर पोहचण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कॅप्सूलमधून दोन अमेरिकन अंतराळवीर रॉबर्ट बेनकेन आणि डगलस हर्ले 63 दिवसानंतर पृथ्वीवर परत येत आहेत. दोघे येताना आपल्यासोबत 9 वर्षांपूर्वी अंतराळात पाठवलेला अमेरिकेचा झेंडा घेऊन येतील.

दरम्यान, 45 वर्षानंतर एखादे अमेरिकन स्पेसशिप समुद्रात लँडिंग करणार आहे. याला अंतराळ संशोधकांच्या भाषेत स्प्लॅश लँडिंग म्हणतात. यापूर्वी 24 जुलै 1975 ला अपोलो सोयूज टेस्ट प्रोजेक्टअंतर्गत असे करण्यात आले होते. ते स्पेस मिशन अमेरिका आणि सोवियत यूनियनने सोबत मिळून लॉन्च केले होते.

मे महिन्यात अंतराळात पाठवले होते स्पेसएक्स

30 मेच्या रात्री भारतीय वेळेनुसार 1 वाजता अमेरिकेच्या कॅनेडी स्पेस सेंटरमधून क्रू ड्रॅगनला फॉल्कन-9 रॉकेटमधून लॉन्च करण्यात आले होते. 19 तासानंतर हे आयएसएसमध्ये पोहचले. या मिशनला ‘क्रू डेमो-2’ आणि रॉकेटला ‘की ड्रॅगन’नाव देण्यात आले होते. 21 जुलै 2011 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेतून मानवी मिशन अंतराळात पाठवण्यात आले. हे मिशन अमेरिकेसाठी महत्वाचे आहे.

बेनकेन आणि हर्लेने चार वेळेस स्पेसवॉक केला

ड्रॅगन कॅप्सूलमधून आयएसएसला गेलेल्या बेनकेन आणि हर्लेने 100 तास अंतराळात काम केले. यादरम्यान त्यांनी चार वेळेस स्पेसवॉक केला. दोघांनी आयएसएसच्या पॉवर ग्रिडमध्ये नवीन बॅटरी लावल्या आणि हार्डवेअरसंबंधी कामात मदत केली.

समुद्रातील लँडिंगसाठी सात ठिकाणे निवडण्यात आली

क्रू ड्रॅगन फ्लोरिडाजवळील समुद्रात उतरू शकतो. यासाठी फ्लोरिडा कोस्टवर ठिकाणं निवडण्यात आली आहेत. यात पेंसाकोला, टँपा, टॅलाहसी, पनामा सिटी, केप कॅनवरल, डायटोना आणि जॅक्सनविल कोस्ट सामील आहेत. परंतू, वातावरणाचा अंदाज घेऊन लँडिंगच्या दोन तासांपूर्वी अंतिम ठिकाण निवडले जाईल. लँडिंगसाठी स्पेसक्राफ्टमध्ये चार पॅराशूट लावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...