आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पेसएक्सची लॉन्चिंग:नासाचे क्रू डेमो -2 मिशन लॉन्च; राष्ट्रपती म्हणाले - कॅप्सूल यशस्वीरित्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचले, दोन्ही अंतराळवीर सुरक्षित

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय वेळेनुसार स्पेसएक्स रॉकेट शनिवारी रात्री 1 वाजता झेपावले
  • 2011 नंतर पहिल्यांदा अमेरिकेने आपल्या भूमीवरून अंतराळवीरांना स्पेस स्टेशनला पाठवले

अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने खासगी कंपनी स्पेसएक्सच्या अंतराळ यानातून 2 अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) पाठविले. भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास रॉकेट केनेडीने स्पेस सेंटर येथून उड्डाण केले. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प मिशन लॉन्च पाहण्यासाठी फ्लोरिडास्थित अंतराळ केंद्रात गेले होते. प्रक्षेपणानंतर काही तासांनी त्यांनी सांगितले की स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल यशस्वीरित्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचला आहे. दोन्ही अंतराळवीर सुरक्षित आणि स्वस्थ आहेत. 

ते म्हणाले की या लॉन्चसह मागील एक दशकाचे आमचे प्रयत्न औपचारिकरित्या पूर्ण झाले. अमेरिकेच्या अपेक्षांचे नवे पर्व सुरू झाले आहे. अमेरिकन अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत पाठविण्याच्या कार्यासाठी देशातील जुन्या नेत्यांनी इतर देशांच्या दयेवर अवलंबून होते. हे यापुढे होणार नाही. 

अमेरिकन भूमीवरून नऊ वर्षांनंतर मानव मिशन पाठविले

या मिशनला 'क्रू-डेमो-2' आणि रॉकेटला 'क्री-ड्रॅगन' नाव देण्यात आले आहे. याद्वारे नासाचे अंतराळवीर रॉबर्ट बेनकेन आणि डगलस हर्ले 19 तासांत आयएसएस पोहचतील. 21 जुलै 2011 नंतर पहिल्यांदा अमेरिकेच्या धरतीवरून एखादे मानव मिशन अंतराळात पाठवण्यात आले. स्पेसक्राफ्टची लॉन्चिंग अमेरिकेच्या विश्वासू रॉकेट फॉल्कन-9ने करण्यात आली. स्पेसएक्स अमेरिकन उद्योगपती अॅलन मस्क यांची कंपनी आहे. ही कंपनी नासाबरोबर भविष्यात अनेक अंतराळ मोहिमेवर काम करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...