आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना महामारीचे परिणाम:स्पेनमध्ये मोकळ्या हवेत भरतोय वर्ग; खासगी शाळांकडून ‘फ्रेश एअर’ नावाचा उपक्रम सुरू

मर्सिया9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 मिनिटांच्या वर्गानंतर नवनवीन उपक्रम करवून घेतले जातात. मासे पकडणे व जाळे फेकणे इत्यादी .

सागरी किनारा, लाटांचा आवाज आणि हळुवार वाहणाऱ्या वाऱ्याच्या संगतीने चालणारा हा वर्ग चित्रपटातील नव्हे तर स्पेनच्या एका शाळेचा आहे. ही शाळा किनाऱ्यावर असा वर्ग भरवते. त्यामुळे विद्यार्थ्यांना माेकळ्या हवेत श्वास घेता यावा आणि मनावरील दडपणही दूर हाेईल, असे शाळेला वाटते. स्पेनच्या मर्सिया येथील खासगी शाळेने ‘फ्रेश एअर’ नावाचा उपक्रम सुरू केला. त्याअंतर्गत ३ ते १२ वर्षांच्या मुलांचे वर्ग किनाऱ्यावर हाेतात.

अभ्यासाबराेबर महामारी व त्यामुळे हाेणाऱ्या हानीबद्दलची माहिती दिली जाते. इंग्लिश शिक्षक जुआन फ्रान्सिस्काे मार्टिनेज म्हणाले, किनाऱ्यावर अभ्यास करताना विद्यार्थ्यांना मजा वाटू लागली आहे. ते अभ्यासात एकाग्र हाेत आहेत.

  • मुलांना लाइव्ह क्लासेसद्वारे शिकवले जात आहे. व्यंगचित्र व गाेष्टींद्वारे त्यांना शिकवले जात आहे. मुले गाेष्टींतून जास्त शिकतात, असे शिक्षकांना वाटते. शिकवण्याची ही पद्धत अतिशय प्रभावी ठरत आहे.
  • समुद्रकिनारी भरलेल्या या वर्गात मुलांना डिस्टन्सिंगसह बसवले जाते. २० मिनिटांच्या वर्गानंतर नवनवीन उपक्रम करवून घेतले जातात. मासे पकडणे व जाळे फेकणे इत्यादी .

बातम्या आणखी आहेत...