आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पेन:संसर्गाचे प्रमाण 35% होते, चाचण्या व व्हेंटिलेटर वाढवून 1% पेक्षा कमी केले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र बार्सिलोनातील एका बगिचाचे आहे. लोकांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत फिरायची सूट दिली आहे. - Divya Marathi
छायाचित्र बार्सिलोनातील एका बगिचाचे आहे. लोकांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत फिरायची सूट दिली आहे.
  • जगातील दुसऱ्या सर्वाधिक बाधित देशातील स्थिती

माद्रिदहून भास्करसाठी : कियारा कोलासांटी

स्पेन जगातील दुसरा सर्वाधिक कोरोना प्रभावित देश आहे. आतापर्यंत २ लाख ६८ हजार १४३ प्रकरणे आढळली आहेत, तर २६ हजार ७४४ मृत्यू झालेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रिटायरमेंट होम्समध्येच सुमारे १५ हजार म्हणजे ५६ टक्के मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. सामाजिक आरोग्य क्षेत्राचे तज्ञ अँटोनिया कॅब्रेरा यांनी सांगितले, रिटायरमेंट होम्समध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. एवढेच नव्हे तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही व्यवस्थित सुरक्षा साहित्य मिळत नाही. पुरेशी कागदपत्रे नसल्याने अनेकांवर उपचार होत नाहीयेत. मात्र सरकार म्हणते की स्थितीवर लक्ष आहे. संसर्ग रोखण्याचे पूर्ण प्रयत्न केले आहेत. आरोग्यमंत्री सॅल्वाडोर इला यांनी सांगितले की, देशात १४ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून रोज ३५ टक्के दराने रुग्ण वाढत होते. ते कमी होत आता ०.०५% दराने वाढत आहेत. 

लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे उत्साहाने पालन केल्याने हे शक्य झाले. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊन काळात लोक घरातून कमी निघाले. आरोग्य कर्मचारी घरी गेले नाहीत. लोकांनी रोज रात्री आठ वाजता घराच्या खिडकीजवळ उभे राहत अारोग्य कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला. लांब राहूनही एकमेकांजवळ राहिले. देशभरात ९.५० लाख चाचण्या केल्या. दर १००० लोकांवर २० चाचण्या केल्या. हे इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. सुरुवातीला देशात व्हेंटिलेटरचा तुटवडा होता. व्हॉलंटिअर्सच्या मदतीने व्हेंटिलेटरचे उत्पादन वाढवले. माद्रिद आणि बार्सिलोनासारख्या मोठ्या शहरांमध्ये जवळपास सर्व रुग्णालयांत आयसीयू केले.

युरोपीय संघ स्पेनची मदत करत असला तरी ती पुरेशी नाही. स्पेनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ते घरी राहून पैसे कमवत नाहीयेत. येथे पुन्हा एकदा २००८ सारखी मंदी येऊ शकते. अशात सरकारने अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान पेंड्रो सॅनचेज यांनी या योजनेला न्यू नॉर्मल नाव दिले आहे. यात ४ टप्प्यांत लॉकडाऊनमध्ये सूट दिली जात आहे. पहिला टप्पा सुरू झाला आहे. त्याचा फायदा ५१ टक्के लोकांना होतोय. बहुतांश भागात काही दुकाने, हॉटेल उघडली आहेत. लोक बाहेर वैयक्तिक खेळ खेळत आहेत. धावताहेत, सायकल चालवताहेत, तेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत. कुटुंब किंवा मित्र १०-१० लोकांच्या गटाने एकत्र वेळ घालवावा यासाठी सरकार दिवस निश्चित करत आहे. असा पहिला दिवस मंगळवारी होता. 

सध्या माद्रिद आणि बार्सिलोनासारख्या शहरांमध्ये लॉकडाऊनमध्ये जास्त सवलत देण्यात आलेली नाही. आणखी एक आठवडा प्रतीक्षा करायची आहे. येथील बगिचांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत जायची सूट आहे. संसर्गाची स्थिती बघून पुढील निर्णय घेतला जाईल. दुसरा टप्पा १८ मेपासून सुरू होईल. मात्र त्याची योजना तयार नाही. इतर टप्प्याची तारीख आणि योजनाही सरकार करत आहे. मात्र एक मूलमंत्र असेल आणि तो आहे सतर्कता. पंतप्रधानांनी सांगितले आहे, जोपर्यंत लस तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोनामध्ये काळजी घेत राहावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...