आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओरिजनल:स्पेन : राजकुमारींचे गुपचूप ‘शाही लसीकरण’; आक्रोश वाढला

माद्रिद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नंबर येण्याआधी लस घेतल्याने अनेक अधिकाऱ्यांची गच्छंती, राजघराण्यावर सामान्य जनतेची नाराजी

स्पेनमध्ये शाही परिवाराचा अपमान व दहशतवाद्यांचे उदात्तीकरण प्रकरणात रॅपरला गेल्या महिन्यात तुरुंगात जावे लागले हाेते. रॅपरच्या पाठिंब्यासाठी देशात तेव्हापासून आंदाेलन सुरू हाेते. आता स्पेनमध्ये आणखी एक वादंग निर्माण झाले आहे. या वेळी स्पेनच्या दाेन राजकुमारींनी आगीत तेल टाकण्याचे काम केले आहे.५७ वर्षीय प्रिन्सेस एलिना व ५५ वर्षीय प्रिन्सेस क्रिस्टिना यांनी अबुधाबीत आपले वडील व माजी राजे जुआन कार्लाेस यांची भेट घेतली. कार्लाेस यांनी मनी लाँडरिंग व कर चाेरी प्रकरणाचा तपास टाळण्यासाठी दुबईत आश्रय घेतला आहे. या प्रवासात राजकुमारींनी काेराेनापासून बचाव करण्यासाठी डाेसही घेतला. त्यांच्या लसीकरणामुळे स्पेनमधील लाेक भडकले. कारण देशातील लसीकरणाच्या अंतर्गत ८० वर्षांहून जास्त वयाचे लाेक व फ्रंटलाइन वर्कर्सला महत्त्व देण्यात आले आहे. परंतु याप्रकरणी नियमांचा भंग केल्यामुळे लष्कराचे चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ, अनेक सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या नंबरच्या आधी डाेस घेतल्यामुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजकुमारींच्या या लसीकरणावर स्पेन सरकारनेदेखील शाही परिवाराला सल्ला दिला आहे. समानता विभागाचे मंत्री इरेन माेन्टराे म्हणाले, ही बाब राजेशाही घराण्याची बदनामी करणारी आहे. एक अन्य मंत्री पाब्लाे इग्लेसियस म्हणाले, शाही परिवारात दरवेळी काहीतरी नवा घाेटाळा उजेडात येत आहे. त्यामुळे आता स्पेनमधील लाेकांमध्ये राजेशाहीचे महत्त्व काय यावरून चर्चा रंगू लागली आहे. आराेग्यमंत्री कॅराेलिना दरियास म्हणाले, देशाला अनुकरणीय वर्तनाची गरज आहे. एवढा आक्राेश सुरू झाल्यानंतर दाेन्ही राजकुमारींनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. काेविड पासपाेर्ट असल्यामुळे वडिलांची सहज भेट होऊ शकली. याआधी क्रिस्टिना यांचे नाव २०१६ मध्ये फसवणुकीत आले हाेते. स्पेनच्या न्यायालयाने २०१७ मध्ये त्यांचे पती इंकी यांना लाखाे युराेच्या अपहार प्रकरणात दाेषी ठरवण्यात आले हाेते. त्याचबराेबर ६ वर्षांची शिक्षाही झाली हाेती. गेल्या महिन्यात स्पेनमध्ये विद्यमान राजांची १५ वर्षीय मुलगी लियाेनारला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्याच्या निर्णयामुळे जनतेमध्ये राेष आहे. कारण, त्यावर ६७ लाख रुपये खर्च हाेऊ शकतात. शाही परिवाराला आपला खर्च भागवण्यासाठी यंदा सरकारने ७५ काेटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. असा निधी देणे म्हणजे करदात्यांच्या पैशाचा अपमान करण्यासारखे आहे, असे लाेकांचे म्हणणे आहे.

कार्लाेस यांच्यावर रॅपरने केली हाेती टीका, प्रकरणात तुरुंगवास
गेल्या वर्षी माजी राजे जुआन कार्लाेस यांचे भ्रष्टाचार, करचाेरी प्रकरण उजेडात आले हाेते. तेव्हापासून स्पेनमध्ये राजेशाहीला विराेध वाढत आहे. कार्लाेस यांच्यावर साैदीकडून १० काेटी डाॅलरची लाच घेतल्याचा आराेप आहे. तपासाचा भुंगा नकाे म्हणून कार्लाेस अबुधाबीत दडून बसले. त्यानंतर राजघराणाच्या विराेधातील संताप आणखीन वाढला. कार्लाेस यांचा अपमान केल्याबद्दल रॅपर पाब्लाे हसेलला ९ महिन्यांची शिक्षा झाली. त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली. अजूनही देशात निदर्शने केली जात आहे. पाब्लाे हसेलची सुटका करा, पाेलिसी हिंसाचार सहन केला जाणार नाही, अशी मागणी लाेकांनी लावून धरली आहे.

बातम्या आणखी आहेत...