आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेख हसीनांची राष्ट्रपती कोविंद-पीएम मोदींना खास भेट:​​​​​​​बांग्लादेशी PM नी पाठवले 1 मेट्रिक टन आंबे, भारताला म्हणाल्या चांगला शेजारी

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद व आपले समकक्ष नरेंद्र मोदी यांना तब्बल 1 मेट्रिक टन आम्रपाली जातीचे आंबे पाठवले आहेत. बांगलादेश उच्चायुक्तांनी ही माहिती दिली. यासंबंधीच्या वृत्तानुसार, यापूर्वीची आंबा-हिल्सा डिप्लोमसीची परंपरा काय ठेवत हसिना यांनी ही अनोखी भेट पाठवली आहे. 2021 मध्ये भारताने बांगलादेशला कोरोनावरील औषधी पाठवली होती. त्यानंतर हसीना यांनी भारताचा उल्लेख एक चांगला शेजारी म्हणून केला होता.

बांगलादेशच्या पंतप्रधानांनी गेल्या वर्षीही कोविंद, मोदी तथा पश्चिम बंगाल, त्रिपुरा व आसामच्या मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून 2600 किलो आंबे पाठवले होते. हे आंबे बांगलादेशातील रंगपूर जिल्ह्यातील हरिभंगा जातीचे होते. ते बेनापाल चेकपोस्टवरून पाठवण्यात आले होते.

भारत एक चांगला शेजारी

कोविड महामारीच्या काळात भारताने बांगलादेशला महत्वपूर्ण औषधी पाठवली होती. त्यानंतर पंतप्रधान हसीना यांनी भारत व पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते. त्यावेळी त्या भारत एक चांगला शेजारी असल्याचे म्हणाल्या होत्या. पीएम मोदींचे आभार मानताना त्या 'हे चांगल्या शेजाऱ्याच्या मुत्सद्देगिरीचे रोल मॉडल आहे,' असे म्हणाल्या होत्या.

मँगो डिप्लोमसी आशिया खंडातील राजकारणाचा भाग

बांगलादेशाशिवाय भारताने पाकिस्तान आणि चीनसोबतही मँगो डिप्लोमसी केली आहे. एकेकाळी पाकिस्तानकडून भारताला भेट म्हणून आंबे पाठवले जायचे. पाकचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यासह पाकच्या अनेक नेत्यांनी भारताला भेट म्हणून आंबे पाठवले होते.

तसे पाहिले तर आशिया खंडात मँगो डिप्लोमसी ही राजकारणाचा एक भाग आहे. गतवर्षी पाकने अनेक देशांना आंबे पाठवले. पण कोणत्याही देशाने त्याच्या आंब्याला फारसे महत्व दिले नाही. चीन व अमेरिकेनेही पाकिस्तानचे आंबे स्वीकारण्यास नकार दिला होता.

1971 पासून लागवड

आंब्यांविषयी बोलायचे झाले तर आम्रपाली आंब्याची 1971 पासून लागवड केली जाते. त्याच वर्षी बांगलादेश पाकपासून स्वतंत्र झाला होता. त्यावेळी डॉ. पियुष कांती मजुमदार यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेत (IARI) हा आंबा 'दशेरी' आणि 'नीलम'चा संकर म्हणून विकसित केला होता. तेव्हापासून त्याची सर्वत्र लागवड केली जाते.

बातम्या आणखी आहेत...