आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्पेलिंग बी स्पर्धेत 20 वर्षांपासून भारतवंशीयांचा दबदबा; तज्ज्ञ म्हणतात, चांगली स्मरणशक्ती, कोचिंग, खिलाडूवृत्ती त्यांना नेहमी पुढे ठेवेल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकी स्क्रिप्स स्पेलिंग बी स्पर्धेत यंदाही अंतिम अकरामध्ये ९ भारतीय वंशाची मुले

एना पी. कंभम्पती
अमेरिकेत १९२५ पासून घेतली जाणारी ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’ स्पर्धा कोरोनामुळे गेल्या वर्षी होऊ शकली नव्हती. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा झाली नाही. मात्र, गेल्या २० वर्षांपासून स्पर्धेत भारतीय वंशाच्या मुलांचे वर्चस्व कायम आहे. दरवर्षी सव्वा कोटी मुले या स्पर्धेत सहभागी होतात. अमेरिकेत शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये भारतीय वंशाच्या मुलांची संख्या एक टक्क्यापेक्षाही कमी आहे, तरीही यंदा ८ जुलैला होणाऱ्या अंतिम टप्प्यात अकरापैकी ९ मुले भारतीय वंशाचे आहेत.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय वंशाचा दबदबा असण्यामागे इंग्रजीचे ५ लाख शब्द पाठ करून घेणेच पुरेसे नाही तर त्या मागे त्यांची चांगली स्मरणशक्ती, कोचिंग, खिलाडूवृत्ती, स्पर्धेबाबत गौरवाची भावनाही महत्त्वाची आहे. स्पेलिंग बी, गणित व विज्ञानाच्या स्पर्धांमध्येही भारतीय वंशाची मुले चांगली कामगिरी करतात.

नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत भारतीय वंशाच्या मुलांच्या विजयामुळेे या स्पर्धेबाबत एक क्रेझ निर्माण झाली आहे. भारतीय समाजात शैक्षणिक कामगिरीला खूप महत्त्व दिले जाते. तसेच चांगली स्मरणशक्ती व उच्च पातळीवरील माहिती ठेवणे प्रतिष्ठेची बाब असते. ड्रियू विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक संजय मिश्रा सांगतात की, अमेरिकेत ६० टक्के भारतीय सन २००० नंतर आले आहेत. २०१६-१७ मध्ये एच१ बी व्हिसाधारकांची संख्या सुमारे ७५ टक्के होती. या स्थलांतरितांनी मुलांना व्यावसायिक आणि शिक्षणाच्या बाबतीत समाजाचे चित्रच बदलले आहे. १९८५ मध्ये बालू नटराज याने ही स्पर्धा जिंकून पहिला भारतवंशी होण्याचा मान प्राप्त केला होता. आता ते म्हणतात, जेव्हा मी विजेता झालो, तेव्हा या स्पर्धेबाबत एवढा विचार केला नव्हता. सध्याची पिढी एक पाऊल पुढे टाकून परिश्रम घेत आहे. यंदाची सर्वात कमी वयाची उपांत्य फेरीतील १० वर्षांची तारिणी नंदकुमारच बघा. ती हिंमत हारली नाही. म्हणाली, पुढच्या वेळी आणखी कष्ट घेईन आणि विजेता होईन म्हणजे काही वर्षांपूर्वी या स्पर्धेत १९ व्या क्रमांकावर राहिलेल्या भावाचे स्वप्न पूर्ण करता येईल.

अंतिम फेरीतील आश्रिता म्हणाली, ३ प्रशिक्षकांसोबत रोज १० तास सराव करते
२७ जूनला अंतिम अकरामध्ये स्थान मिळवणारी भारतीय वंशाची १४ वर्षांची आश्रिता गांधारी म्हणते, हा स्पेलर्स व स्पेलर्सचा सामना नाही, तर स्पेलर्स व शब्दकोशाचा सामना आहे. मी या स्पर्धेसाठी तीन प्रशिक्षकांसोबत रोज १० तास सराव करत आहे. नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेचे आयोजक आणि कार्यकारी संचालक जे मायकल डर्निल यांचे म्हणणे आहे की, स्पर्धकांच्या गुणवत्तेत आधीपेक्षा जास्त सुधारणा झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...