आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Spray Paint Vessel On Mahatma Gandhi Statue In America, Hoist Khalistani Flags During Support To Farmer's Protest

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मार्गावरून भटकणारे शेतकरी आंदोलन:अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, पुतळ्याच्या चेहऱ्यावर रंग फासला; खलिस्तानी झेंडे फडकवले

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या लोकांनी केले अभद्र वर्तन

शेतकरी कायद्याचा विरोध करणारे आंदोलक आता मार्गावरून भटकताना दिसत आहेत. याचे ताजे उदाहरण अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये समोर आले. येथे शेतकरी कायद्याचा विरोधात आंदोलन करणाऱ्या काही लोकांनी महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

आंदोलकांनी विरोध दर्शवताना खलिस्तानी झेंडे दाखवले असल्याची बाबही समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनात प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी शनिवारी भारतीय दूतावास समोरील गांधींजीच्या पुतळ्यावर स्प्रेने रंग लावला. तसेच खालिस्तानी झेंड्याने गांधीजींचा चेहरा झाकला होता. दरम्यान या प्रकरणी भारतीय दूतावासच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोपोलिटन पोलिस आणि नॅशनल पार्क पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या घटनेबद्दल उपसचिव स्टीफन बीगन यांनी माफी मागितली आहे. याआधीही लंडनमध्ये भारतीय उच्च आयोगाच्या बाहेर शीख बांधवांनी निदर्शनं केली होती. त्यावेळीही खलिस्तानी झेंडे दाखवण्यात आले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser