आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लस:स्पुटनिक-5 लस 2 वर्षांपर्यंत कोरोनापासून वाचवू शकते, गामलेय नॅशनल रिसर्च सेंटरच्या प्रमुखांचा दावा

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतासह जग कोरोना लसीची प्रतीक्षा करत असतानाच स्पुटनिक-५ बनवणाऱ्या रशियाच्या गामलेय नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने लसीच्या परिणामाबाबत मोठा दावा केला आहे. सेंटरचे प्रमुख अलेक्झांडर जिंट्सबर्ग म्हणाले की, स्पुटनिक-५ लस दोन वर्षांपर्यंत कोरोनापासून बचाव करू शकते. मात्र, मी सध्या लसीबाबत फक्त सूचना करू शकतो, माझ्याकडील तथ्याला दुजोरा मिळण्यासाठी एक्सपेरिमेंटल डेटाची गरज आहे.

भारत सरकारने गामलेय सेंटरकडून स्पुटनिक-५ लसीचे १० कोटी डोस खरेदी करण्याचा करार केला आहे. रशियाने ११ ऑगस्टला स्पुटनिकची नोंदणी केली होती. तेव्हा ही जगातील पहिली कोरोना लस ठरली होती. मात्र, तेव्हा तिच्या दोन टप्प्यांतील चाचण्या बाकी होत्या. दरम्यान, ब्रिटननंतर आता अमेरिकेत सोमवारपासून फायझर-बायोएनटेकची लस देण्यास सुरुवात होणार आहे. तिची पहिली खेप मिशिगनच्या कलामाजू येथून निघाली आहे. ही लस १६ वर्षांवरील व्यक्तींना देण्यासाठी एफडीएने शनिवारी मंजुरी दिली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser