आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:एअर इंडियाची 9 एप्रिलपासून श्रीलंका विमानसेवेमध्ये घट, संचारबंदीचे उल्लंघन; 600 वर अटकेत, इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला तोंड

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंका इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. भीषण संकट असल्यानेच एअर इंडियाने ९ एप्रिलपासून भारत-श्रीलंकेतील उड्डाण संख्येत घट केली आहे. मागणी कमी असल्याने आठवड्याला १३ उड्डाणे केले जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या ही संख्या १६ एवढी आहे. आता दिल्लीहून एक उड्डाण, चेन्नईतून आठवड्याला नऊ उड्डाणांची व्यवस्था आहे. श्रीलंकेत ३६ तासांच्या राष्ट्रव्यापी संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी ६६४ जणांना अटक झाली. पश्चिमेकडील प्रांतात ही कारवाई झाली.

सोशल मीडिया बंद
श्रीलंकेचे राजपक्षे सरकारने फेसबुक, फेसबुक मेसंेजर, ट्विटर, व्हॉट्सअप, यूट्यूब, स्नॅपचॅट, ट्विटर पेरिस्कोप, गुगल व्हिडिआे, टिकटॉक, वायबर, टेलिग्राम, इन्स्टाग्रामवर निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु विरोधानंतर १५ तासांनी बंदी हटवली.