आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका काळोखात:थर्मल जनरेटरसाठी इंधन नसल्याने श्रीलंका अंधारात, पावणेचार लाख कोटी रुपयांहून जास्त कर्ज, तेल-खरेदीसाठी पैसे नाहीत

श्रीलंका3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश भागात वीज कापण्यात आल्याने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. - Divya Marathi
बहुतांश भागात वीज कापण्यात आल्याने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

आर्थिक तंगीला तोंड देणारी श्रीलंका विजेअभावी काळोखात बुडाली आहे. थर्मल जनरेटरला आवश्यक तेल खरेदीसाठी सरकारकडे पैसा नाही. श्रीलंकेवर सुमारे पावणेचार लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. तेल व डिझेल खरेदीसाठी देशाकडे पुरेसा निधी नाही. श्रीलंकेसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. देशाचा निम्मा वीजपुरवठा जलविद्युत केंद्रामार्फत होतो. परंतु यंदा पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्यामुळे जलस्रोत कोरडेठाक आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून अपेक्षित वीजनिर्मिती होताना दिसत नाही. उर्वरित वीजनिर्मितीसाठी थर्मल जनरेटर चालवण्यासाठी तेल उपलब्ध नाही.

बुधवारी श्रीलंकेत दहा तासांपर्यंत वीज कपात करण्यात आली होती. गुरुवारपासून वीज कपात तेरा तासांपर्यंत केली जाणार आहे. वीज कपातीच्या विरोधात श्रीलंकेतील अनेक शहरांत लोक रस्त्यावर उतरले आहेत.

  • 22 टक्के वीज निर्मिती कोळसा विद्युत प्रकल्पातून होते.
  • 40 टक्के जास्त वीज निर्मिती जलविद्युत प्रकल्पातून होते.
बातम्या आणखी आहेत...