आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेप:भारताच्या विरोधानंतर श्रीलंकेने चीनचे हेरगिरी करणारे जहाज रोखले

कोलंबो6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या आक्षेपानंतर श्रीलंकेने चीनचे हेरगिरी करणारे जहाज हंबनटोटा बंदरात येण्यापासून रोखले. दोन्ही सरकारांत पुढील चर्चा होत नाही तोपर्यंत चीनने त्याचे ‘युुआन वँग’ हे अंतराळ उपग्रह ट्रॅक करणारे जहाज रोखावे, असे श्रीलंकेने चीनला बजावले. हे जहाज सध्या तैवानच्या सागरी सीमेजवळ तैनात आहे, तेथे चीनचा सराव सुरू आहे. ते हिंदी महासागरात संरक्षणविषयक संशोधनासाठी प्रख्यात आहे. श्रीलंकेने ते ११ ते १७ ऑगस्टपर्यंत हंबनटोटात रोखण्यास मंजुरी दिली होती. त्याची रेंज ७५० किमी असल्याने भारताने आक्षेप घेतला होता. ते तामिळनाडूच्या किनारपट्टी भागांत भारताच्या हालचालींची गोपनीय माहिती चोरू शकते.

बातम्या आणखी आहेत...