आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनी फंडिंग असलेल्या श्रीलंकेतील नोरोचचोलाई कोळसा ऊर्जा प्रकल्पातून निघणारे विषारी अॅसिड जगातील सर्वात पुरातन श्री महाबोधी वृक्षासाठी धोका ठरण्याची शक्यता आहे. यात परिसरात सर्व्हे केल्यानंतर इकोलॉजिस्टनी सांगितले की ऊर्जा प्रकल्पातून निघणारे अॅसिडिक क्लाऊड अनुराधापुराकडे जाऊ शकतात. तिथे महाबोधी वृक्ष आहे.
ऊर्जा प्रकल्पाच्या जवळ असलेल्या झाडांवर याचे परिणाम दिसायला लागले आहेत. विषारी वायूमुळे काही उंच वृक्षांची पाने पिवळी पडली आहेत. परिसरात राहणाऱ्या अनेक मुलांना त्वचारोगही झाले आहेत.
ऊर्जा प्रकल्पाची उप-उत्पादने पर्यावरणासाठी घातक
नोरोचचोलाई प्रकल्प श्रीलंकेतील सर्वात मोठा औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे. 900MW च्या या प्रकल्पाने निश्चित मानकांपेक्षा जास्त ऊत्सर्जन केले आहे. या प्रकल्पात अनेकदा ब्रेकडाऊनला अडचण येत असल्याने असे होत आहे. तर प्रकल्पातून निघणारी फ्लाय अॅश आणि बॉटम अॅश एका खुल्या खड्ड्यात साठवली जाते. ही प्रकल्पातील उप-उत्पादने आहेत.
खुल्या खड्ड्यात ठेवल्याने ते हवेसह आसपासच्या परिसरात उडून पसरतात. यामुळे बालकांना त्वचा विकार होत आहेत. याशिवाय प्रकल्पातून निघणाऱ्या उष्ण पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर घन, उष्णता आणि जल कचराही वाढत आहे. ही आम्ल स्थिती हळूहळू सागरी क्षेत्राकडे सरकत आहे.
चीनी कंपनी सिनोपेक हंबनटोटामध्ये गुंतवणूक करणार
वृत्तांनुसार, चीनच्या सिनापेक कंपनीने श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरात गुंतवणुक करणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीचे अधिकारी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघेंदरम्यानच्या एका बैठकीनंतर देशाच्या माध्यम शाखेने याची घोषणा केली. कोलंबो गॅझेटनुसार, आधीही चीनी उत्पादनांमुळे अनेकदा महाबोधी वृक्षासाठी धोका निर्माण झाला आहे. तर श्रीलंकेला कर्ज देण्यासाठी आयएमएफच्या अटींना मंजुरी दिल्यानंतर चीन लवकर इथे परतणार आहे.
चीनला श्रीलंकेत लष्करी तळ उभारायचा आहे
चीनला श्रीलंकेतील बंदरे आणि ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढवायची आहे. श्रीलंकेतील मागील सरकारदरम्यान चीनने 1.5 अब्ज डॉलरच्या खर्चातून उभारलेले हंबनटोटा बंदर 99 वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर देण्यात आले होते. वृत्तांनुसार चीनने बंदराच्या चारही बाजूंना 15 हजार एकरचे औद्योगिक क्षेत्र बनवण्याचेही आश्वासन दिले होते, जे अजून पूर्ण झालेले नाही. श्रीलंकेला अब्जावधी डॉलर्सचे कर्ज आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून हंबनटोटामध्ये लष्करी तळ उभारण्याची चीनची योजना असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जगातील सर्वात जुना वृक्ष आहे महाबोधी
श्रीलंकेच्या वायव्येकडील प्रांतात उभारलेला नोरोचचोलाई ऊर्जा प्रकल्प अनुराधापुरातील श्री महाबोधी वृक्षापासून सुमारे 1 तासाच्या अंतरावर आहे. महाबोधी वृक्ष जगातील सर्वात जुना वृक्ष आहे. ज्याचा लिखित इतिहास उपलब्ध आहे. हा महाबोधी वृक्ष भारताच्या गयामधील पवित्र बोधी वृक्षाच्या एका फांदीपासून उगवण्यात आला होता. बौद्ध धर्मात या वृक्षाचे मोठे महत्व आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.