आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनच्या कर्जात बुडालेल्या श्रीलंकेचे संकट कमी होत नाही. महागाई ५७% वर आहे. आर्थिक चणचणीमुळे खाण्या-पिण्याच्या पदार्थांसोबत इंधन आणि औषधांची टंचाई आहे. यामुळे श्रीलंका सुरक्षेबाबत तडजोड करण्यास असहाय झाला आहे. तो सध्याचे २ लख जवानांचे दल एक तृतीयांश घटवत आहे. आता तो सुमारे १.३५ लाख जवानच ठेवेल. एवढेच नव्हे तर २०३० पर्यंत जवानांचा आकडा निम्मा करत १ लाखापर्यंत मर्यादीत करेल. मात्र, या संदर्भात सरकार म्हणाले की, कपातीचे पाऊल उचलून तंत्रज्ञान आणि रणनीतीच्या दृष्टीने बळकट आणि संतुलित संरक्षण दल तयार करत आहोत. संकटातून बाहेर पडण्याच्या उपायांअंतर्गत श्रीलंका आपल्या वार्षिक अर्थसंकल्पात ६% कपात करेल. यादरम्यान, भारतीय विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्या दौऱ्यातून श्रीलंकेला मोठा दिलासा मिळाला आहे. ते कोलंबोला गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळण्याचा रस्ता मोकळा झाला आहे.श्रीलंकन सरकारच्या सूत्रांनुसार, जयशंकर आल्यामुळे चीन दबावात आला आहे. त्याने श्रीलंकेच्या मदतीसाठी पाऊल उचलले आहे.
उपासमार : शाळा पालकांना सांगतात, मुलांना शाळेत पाठवू नका आर्थिक तंगीने ग्रासलेल्या श्रीलंकेची वेदनादायक स्थिती समोर येत आहे. शाळांत मुलांना भोजन दिले जात नाही. मुलांना रिकाम्या पोटी आणि भोजन दिल्याशिवाय पाठवू नका,असे शाळा पालकांना सांगत आहेत. द.श्रीलंकेतील मथुगामात होरावाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य अनोमा श्रीयांगी धर्मवर्धने यांच्यानुसार, प्राथमिक वर्गांत शिकणारी बहुतांश मुले उपाशी येत आहेत. प्रार्थनेवेळी रोज २०-२५ मुले बेशुद्ध पडतात. माध्यन्ह भोजनासाठी निधीवर अवलंबून आहोत. संस्था फूड फर्स्ट इन्फॉर्मेशन अँड अॅक्शन नेटवर्कचे अध्यक्ष एस.विश्वलिंगम यांच्यानुसार, श्रीलंकेत सध्या २०% मुले नाष्ट्याविना शाळेत येतात. पालकही संकटाचा सामना करत आहेत.
मातृत्व संकट : गरोदर महिलांनाही मिळत नाही पोटभर भोजन श्रीलंकेत गरोदर महिलांची स्थिती वाईट झाली आहे. काही एनजीओंच्या म्हणण्यानुसार, देशातील १०% गरोदर महिला सध्या कुपोषित आहेत. त्यांना पौष्टिक जेवण तर लांब दोन वेळची जेवणही मिळत नाही. दुसरीकडे, प्रसूतीसाठी जाणाऱ्या कंचनाने सांगितले की, डॉक्टर म्हणाले की, त्यांची तब्येत बिघडली आहे.त्यांनी जेवणा-खाण्यावर लक्ष न दिल्यास त्याचा गर्भावर परिणाम होईल.
वाढते कर्ज : कॅन्सरसह गंभीर आजारांवर औषध नाही, पॅरासिटामॉलची टंचाई श्रीलंकेत रुग्णांची स्थिती वाईट आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी सामना करणाऱ्या लोकांना औषध मिळत नाही. कॅन्सर रुग्णालयात औषधाची टंचाई आहे. सरकारी वैद्यकीय अधिकारी संघटनेचे प्रवक्ते वासन रत्नासिंगम म्हणाले, ओपीडीत पॅरासिटामॉल, व्हिटॅमिन सी आणि सलाइनसारख्या सुविधा कशाबशा मिळत आहेत. कॅन्सर आणि डोळ्याच्या आजारासारख्या सुविधा देणगीवर चालू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.