आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांच्या दबावामुळे लंकेच्या PM चा राजीनामा:सरकार समर्थक-विरोधकांच्या हिंसाचारात खासदाराचा मृत्यू, माजी मंत्र्याचे घर जाळले

कोलंबो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमालीच्या आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी अखेर सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजधानी कोलंबोसह देशाच्या अनेक भागांत सरकार समर्थक व विरोधकांत हिंसक संघर्ष उफाळला आहे. त्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकीर्ति अथुकोरला यांचा मृत्यू झाला आहे. जमावाने माजी मंत्री जॉन्स्टन फर्नांडो यांच्या माउंट लॅव्हिनिया भागातील आलिशान घर पेटवून दिले आहे. त्यात त्यांचे कुटूंब थोडक्यात बचावलेत. हिंसक जमावाने अन्य एक खासदार सनथ निशांथा यांच्या घरावरही जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढे काय होणार?

गत आठवड्यात प्रमुख विरोधी पक्षनेते सिरिसेना यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांची भेट घेतली होती. त्यात पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लंकेत अंतरिम सरकार स्थापन होईल. पण, तत्पूर्वी देशात शांतता प्रस्थापित करावी लागेल. सरकारमध्ये सध्या राजपक्षे कुटूंबाचा दबदबा आहे. हे घराणे सरकारमध्ये विरोधकांचा समावेश करुन आपल्या अपयशाचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडण्याच्या प्रयत्नांत आहे. याऊलट देश वाचवण्यासाठी विरोधकही सरकार व विशेषतः राष्ट्रपती गोटाबाया यांची साथ देण्यास तयार असल्यामुळे लंकेत लवकरच अंतरिम सरकार दिसून येईल.

निवडणुकीच्या बॅनरमध्ये अमरकीर्ति दिसून येत आहेत. त्यांचा सोमवारी संशयास्पद मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांना जमावाने घेरले होते. स्वतःच्या बचावासाठी त्यांनी गोळीबारही केला होता.
निवडणुकीच्या बॅनरमध्ये अमरकीर्ति दिसून येत आहेत. त्यांचा सोमवारी संशयास्पद मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांना जमावाने घेरले होते. स्वतःच्या बचावासाठी त्यांनी गोळीबारही केला होता.

हिंसाचार कुणाच्या इशाऱ्यावर

श्रीलंकेच्या अनेक भागांत पोलिस व निदर्शकांत हिंसक चकमकी सुरू आहेत. त्यातच महिंदा यांच्या राजीनाम्यामुळे स्थिती अधिकच बिकट बनली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती तथा महिंदा यांचे मोठे बंधू गोटाबाया राजपक्षे यांची महिंदा यांचा राजीनामा घेण्याची इच्छा नव्हती. पण, विरोधकांच्या मागणीपुढे त्यांना झुकावे लागले. आता राजपक्षे यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांच्या समर्थकांत मोठी राडेबाजी सुरू झाली आहे.

कोलंबोत निदर्शने करणाऱ्या नागरिक व पोलिसांत हिंसक झडप झाली. यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
कोलंबोत निदर्शने करणाऱ्या नागरिक व पोलिसांत हिंसक झडप झाली. यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

महिन्याभरात दुसऱ्यांदा आणीबाणी

देशावरील आर्थिक संकटाविरोधात सर्वसामान्य नागरिकांनी शुक्रवारी नॅश्नल असेम्ब्लीपुढे हिंसक निदर्शने केली. यामुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंना देशात पुन्हा आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली. यापूर्वी 1 एप्रिल रोजी आणीबाणी घोषित करण्यात आली होती. ती 6 एप्रिल रोजी रद्द करण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा ती लागू करण्यात आली आहे.

अर्थव्यवस्थेवरील संकटामुळे जनतेतील आक्रोष वाढत असून, नागरिक रस्त्यावर उतरलेत.
अर्थव्यवस्थेवरील संकटामुळे जनतेतील आक्रोष वाढत असून, नागरिक रस्त्यावर उतरलेत.
पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान कार्यालयाबाहेर ठाण मांडलेले आंदोलक.
पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान कार्यालयाबाहेर ठाण मांडलेले आंदोलक.
आंदोलनादरम्यान सरकार समर्थक व विरोधकांत हिंसक चकमक झाली. त्यानंतर राजधानी कोलंबोत लष्करी जवान तैनात करण्यात आलेत.
आंदोलनादरम्यान सरकार समर्थक व विरोधकांत हिंसक चकमक झाली. त्यानंतर राजधानी कोलंबोत लष्करी जवान तैनात करण्यात आलेत.

बांग्लादेशकडून 20 कोटी डॉलर्सचे कर्ज फेडण्यासाठी वाढीव मुदत

श्रीलंका आपल्या (1948) स्थापनेपासून प्रथमच एवढ्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. लंकेची परदेशी गंगाजळी जवळपास संपुष्टात आली आहे. यामुळे अत्यावश्यक वस्तुंची आयात करताना त्याला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, बांग्लादेशाने लंकेला दिलेल्या 20 कोटी डॉलर्सचे कर्ज फेडण्याची मुदत वर्षभराने वाढवली आहे.

2021 मध्ये दिले होते कर्ज

बांग्लादेशाने गतवर्षी मे महिन्यात मुद्रा विनिमय कराराच्या माध्यमातून श्रीलंकेला 20 कोटी डॉलर्सचे कर्ज दिले होते. हे कर्ज लंकेला 3 महिन्यांत फेडावयाचे होते. पण, त्यानंतर लंकेत गंभीर आर्थिक संकट उद्भवले. यामुळे बांग्लादेशाने कर्ज फेडण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री ए.के. अब्दुल मोमेन व आरोग्य मंत्री जाहिद मालेक यांनी श्रीलंकेतील उच्चायुक्त सुदर्शन डी एस सेनेविरत्ने यांना औषधांच्या पेट्या सोपवल्या.
बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री ए.के. अब्दुल मोमेन व आरोग्य मंत्री जाहिद मालेक यांनी श्रीलंकेतील उच्चायुक्त सुदर्शन डी एस सेनेविरत्ने यांना औषधांच्या पेट्या सोपवल्या.
बातम्या आणखी आहेत...