आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Sri Lankan Tamils To Be Considered Refugees, Camps Set Up In Mandapam, Thousands Expected To Arrive In India| Marathi News

श्रीलंकेत अस्थिरता:श्रीलंकन तामिळींना निर्वासित मानले जाईल, मंडापममध्ये छावण्या उभारणी सुरू, हजारो लोक भारतात येण्याची शक्यता

चेन्नई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेत अस्थिरतेमुळे तामिळनाडू सरकारने तोंडी आदेश देत इथे येणाऱ्या श्रीलंकन तामिळींना निर्वासित मानले जाईल, असे म्हटले. तसेच तामिळनाडूतील रामेश्वरमच्या मंडापममध्ये शिबिरे बनवण्यास सुरुवात केली. तामिळनाडू सरकारचे म्हणणे आहे की, श्रीलंकेतील सध्याचे आर्थिक संकट आणि अस्थिरतेमुळे भारतात येणाऱ्या तामिळींना निर्वासित मानण्याचे आदेश अंतरिम असतील. याबाबत अंतिम आदेश केंद्र सरकारवर अवलंबून असेल. तामिळनाडू सरकारचे म्हणणे आहे की, आगामी काळात श्रीलंकेतून हजारो तामिळी भारतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पाऊल उचलले आहे. वस्तुत: काही दिवसांपूर्वी श्रीलंकेहून दोन नावेत काही तामिळ आले होते. त्यांना परदेशी समजून अटक केली होती. आता तामिळनाडू सरकारच्या नव्या आदेशानंतर कोर्टाने या सर्वांना जामीन दिला आहे. तामिळींना आता निर्वासित शिबिरांत ठेवले आहे. तामिळनाडूच्या निर्वासित विभागाचे आयुक्त जेसिंथा लाजरस म्हणाले, श्रीलंकेतून येणाऱ्या महिला-मुलांची काळजी घेत आहोत.

राजपक्षे : पीएम महिंदांनी धाकटे बंधू राष्ट्रपती गोटाबायांकडे राजीनामा दिला
संकटात सापडलेल्या श्रीलंकेत राजीनाम्यांचा खेळही सुरू झालाय. पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कॅबिनेटच्या २६ मंत्र्यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंना राजीनामे सुपूर्द केले आहेत. महिंदा हे गोटाबायांचे मोठे बंधू आहेत. त्यांचे बंधू अर्थमंत्री बासिल राजपक्षे आणि कृषिमंत्री चमाल राजपक्षेंसह महिंदांचे चिरंजीव क्रीडामंत्री नमाल राजपक्षेंनीही राजीनामा दिला. मात्र, जनतेत राजपक्षे घराण्यावर रोष आहे. गोटाबायांनी विरोधकांना सरकारमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला आहे. सोमवारी गोटाबायांनी ४ मंत्र्यांची नियुक्ती केली.

*मोदींना आवाहन : विरोधक म्हणाले, आम्हाला मदत करा : श्रीलंकेत विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संदेश पाठवला- आमची मदत करा. सामूहिक राजीनामे जनतेला धोका देण्यासाटी ‘ड्रामा’ आहे.

*सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरचाही राजीनामा : श्रीलंकेच्या आर्थिक तंगीसाठी जबाबदार सेंट्रल बँकेचे गव्हर्नर अजित निवार्ड कबराल यांनीही राजीनामा दिला. सात महिन्यांपूर्वीच ते गव्हर्नर झाले होते.

१३ वर्षांनंतर परत : समुद्राच्या जीवघेण्या लाटांत आपल्या छोट्याशा नावेतून पुन्हा भारतात आले
श्रीलंकेतील कोकुपाडयमची महिला डोरी यांचे म्हणणे आहे, मी आपल्या कुटुंबासह २००९ मध्ये श्रीलंकेतून परत आले. स्थिती बिघडल्यानंतर समुद्राच्या जीवघेण्या लाटांची पर्वा न करता मी छोट्याशा नावेतून भारतात आले. रामेश्वरममध्ये मच्छीमारांच्या संघटनेचे अध्यक्ष सेसुराजांचे म्हणणे आहे, श्रीलंकेहून येणाऱ्या तामिळींविरोधात गुन्हे दाखल करू नयेत.

निर्वासित बाले : ५०० रु. किलो तांदूळ, २९० रु. किलो साखर, तिथे असतो तर उपाशी मेलो असतो
तामिळ निर्वसित महिला शिवासन्कारी म्हणाली, श्रीलंकेत ५०० रुपये किलो तांदूळ, साखर २९० रु. किलो, तर ४०० ग्रॅम दूध पावडर ७९० रुपयांना मिळते. छोट्या कुटुंबाला खाण्यासाठी दररोज सुमारे अडीच हजार रुपये हवेत. शिवासन्कारी म्हणते, आमच्यासारख्या रोजंदारी कामगारांना रोज ५०० रुपये मिळतात. तिथे राहिलो असतो तर आम्ही उपाशीच मेलो असतो.

बातम्या आणखी आहेत...