आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलंबो:श्रीलंकेचे पीएम राजपक्षे नौदल तळात लपले; आंदोलकही धडकले

कोलंबो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक अरिष्ट आणि त्याविरोधातील आंदोलनादरम्यान श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांचे संपूर्ण कुटंब राजीनाम्यानंतर आंदोलकांपासून वाचण्यासाठी नौदलाच्या त्रिंकोमाली तळावर लपले आहे. लष्कराने महिंदा राजपक्षे यांना त्यांच्या घरातून काढून हेलिकॉप्टरने त्रिंकोमाली तळावर आणले.

मात्र, ही बातमी पसरल्यानंतर आंदोलक नौदल तळाजवळ जमा झाले. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानाला घेरून त्यात पेट्रोल बॉम्ब फेकले, गाड्याही जाळल्या. त्याआधी सोमवारी सरकार समर्थकांनी आंदोलकांवर हल्ला केल्यानंतर हिंसाचार उफाळला.

बातम्या आणखी आहेत...