आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Sri Lanka's Treasury Down Due To China's Debt; Lithuania Says Europe Should Be Careful | Marathi News

ड्रॅगनचे जाळे:चीनच्या कर्जामुळे श्रीलंकेचा खजिना खाली; लिथुआनिया म्हणतो, युरोपने सावधान व्हावे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या देशांच्या यादीत भारताचा शेजारी देश श्रीलंका आणि युरोपीय देश लिथुआनियाही सहभागी आहेत. श्रीलंकेवर चीनचे सुमारे ३७ हजार कोटी रुपयांचे कर्ज चढले आहे. ही रक्कम श्रीलंकेला याच वर्षी द्यावी लागणार आहे. मात्र श्रीलंकेकडे सध्या सुमारे ११ हजार कोटी रुपयांचाच परकीय चलन साठा आहे. श्रीलंकेवर एकूण ५४ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. एकूणच हे कर्जाचे प्रमाण ६८ टक्के आहे. तिकडे लिथुआनियाचे परराष्ट्रमंत्री ग्रब्रियेल्स लँडबर्गिस यांनी सोमवारी सावध केले की चीन जाणीवपूर्वक आर्थिक हल्ले करत आहे. तैवानला मान्यता देण्याच्या नावावर केले जात असलेले असे हल्ले युरोपसाठी मोठा इशाराही आहे. ते म्हणाले, चीन आपला बाजार मोकळा करून आधी अशा देशांना आपल्यावर निर्भर बनवतो, जे देश नंतर आपली राजकीय धोरणे त्यांच्यावर थोपवून त्यांची पुरवठा साखळी रोखून धरतो. चीन मागील काही दिवसांपासून जगातील सर्वात मोठा कर्जदाता म्हणून पुढे आला आहे. युगांडा त्याचे कर्ज परत न करू शकल्याने त्याचा एकमेव विमानतळही गमावून बसला आहे. चीन बेल्ट अँड रोडच्या नावावर मैत्री करून देशांना कर्जबाजारी करतो.

श्रीलंका: महागाई दर २२%, सेनेच्या निगराणीत रेशन वाटप
श्रीलंकेत खाद्य महागाई दर २२ टक्के झाला आहे. आर्थिक आणीबाणीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर सेनेच्या निगराणीत रेशन वाटप केले जात आहे. लोकांकडे खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. एक दुकानदार अनिरुद्धा यांच्या मते, दुकानदार एक िकलोचे दूध पावडर २००-२०० ग्रॅमची पाकिटे करून विकत आहेत. कारण लोक एक किलोचे पाकीट खरेदी करण्यास सक्षम नाहीत. जागतिक बँकेच्या आकड्यांनुसार कोराेना काळातही सव्वादोन कोटी लोकसंख्येच्या श्रीलंकेत सुमारे ५ लाख लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत.

मालदीव : चीनचे २३ हजार कोटी कर्ज, जीडीपीच्या सुमारे ५३ टक्के
अॅडडाटा रिसर्च लॅबच्या एका अहवालानुसार चीन दक्षिण आशियातील अन्य देशांवरही कर्जाचे जाळे पसरवत आहे. मालदीववर चीनचे सुमारे २३ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे मालदीवच्या जीडीपीच्या सुमारे ५३ टक्के आहे. चीनने मालदीवला कर्ज कमर्शियल लोनच्या नावावर दिले आहे. म्हणजे ते अत्यंत कठोर अटींवरील आणि जास्त व्याजावर दिलेले कर्ज आहे.

लिथुआनिया : सर्वात मोठे बंदर खरेदी करण्याचा चीनने रचला होता कट
चीनने युरोपसाठी १७ प्लस प्लॅननुसार लिथुआनिया देशासोबत व्यापार वाढवला. त्यानंतर त्याने लिथुआनियाच्या जवळपास ६० मोठ्या कंपन्यांसोबत करार केला. आता लिथुआनिया सरकारने आपल्या कंपन्यांसाठी एक लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. सोबतच चीनने त्यांचे सर्वात मोठे बंदर कायलपेडा खरेदी करण्याचा कट रचला होता.

बातम्या आणखी आहेत...