आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिकोल होंग
अमेरिका कोरोना विषाणूच्या तावडीत आहे आणि न्यूयॉर्क त्याचे सर्वात मोठे केंद्र आहे. येथील रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता झाली आहे. स्थिती ही आहे की, शहरातील बहुतांशी रुग्णालयांत आता कोरोना रुग्णांच्या उपचारात अवैद्यकीय कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे. यात कुुक, रिसेप्नशनिस्ट, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक मुख्य आहेत, ज्यांना रुग्णांचे पलंग तपासण्याबरोबरच त्यांची वैद्यकीय माहिती ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ते रुग्णांच्या उपचारातही मदत करत आहेत. हेच कर्मचारी रुग्णांचे नातेवाइकांचे रुग्णालयात येणारे फोनही घेत आहेत. यातील अनेकांनी संसर्गामुळे आपला जीव गमावला आहे.
तुम्ही रोज सायंकाळी ७ वाजता लोकांना बाहेर येत टाळ्या वाजवताना पाहत असाल, मात्र ते केवळ डॉक्टर आणि नर्ससाठी आहे. त्यांच्यासाठी नाही, जे पांढरे कपडे घालत नाहीत, मात्र तरीही रुग्णालयात काम करत आहेेत, हे म्हणणे आहे अॅनिडा बिकोट यांचे. ज्यांचे पती अॅडवर्ड बिकोट यांचा संसर्गामुळे गेल्या महिन्यात मृत्यू झाला. ते ब्रुकलीन रुग्णालयात स्ट्रेचर आणि व्हीलचेअरवरून रुग्णांची ने-आण करण्याचे काम करायचे. अॅडवर्ड त्या ३२ रुग्णालय कर्मचाऱ्यांपैकी एक होते, जे न्यूयॉर्कमध्ये संसर्गामुळे मारले गेले.
ताज्या आकड्यांनुसार न्यूयॉर्कच्या रुग्णालयात काम करणारे ७९% अवैद्यकीय कर्मचारी डॉक्टर आणि नर्सची मदत करत आहेत. आपात कक्षात काम करणाऱ्या नर्सना एन- ९५ मास्क देण्यात आले आहेत, मात्र अवैद्यकीय कर्मचाऱ्यांना नाहीत. रुग्णालय कर्मचारी युनियननुसार आमच्याकडे सुरक्षेसाठी मास्क किंवा ग्लोव्हजसारखी साधने नाहीत. कारण ते डाॅक्टर व नर्स यांना आधी दिले जात आहेत. युनियनचे अध्यक्ष कार्मेन चार्ल्स सांगतात की, न्यूयॉर्कच्या रुग्णालयात ८५०० बिगर वैद्यकीय कर्मचारी काम करतात, जे धोक्यात आहेत. कार्मेन यांच्यानुसार आमची गरज आहे हे खरे असले तरी कोणत्या किमतीवर. आमचा प्राण वाचवणारे मास्क, ग्लोव्हज कुठे आहेत? बिगर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा विरोध बघून काही रुग्णालयांत सुरक्षा उपकरणे उपलब्ध केली, मात्र अजूनही त्यांंची संख्या पुरेशी नाही.
ट्रम्प पुन्हा पलटले, आता म्हणाले- १ लाख जीव जाण्याची भीती
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात कोरोनामुळे ६० हजार मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र आता या विधानावरून पलटले आहेत. रविवारी फॉक्स न्यूजसोबतच्या टाऊनहाॅल मीटिंगमध्ये त्यांनी सांगितले की, महामारीमुळे आम्ही ७५,८० हजार ते १ लाख लोकांचे प्राण गमावणार आहोत. हे भीतिदायक आहे, मात्र आम्हाला एकही जीव गमवायचा नाही. तसेच त्यांनी स्वत:चा बचाव करताना सांगितले, जर आम्ही वेळेवर पाऊल टाकले नसते तर हा आकडा १० लाखांच्या पुढे राहिला असता. बहुतेक २० लाख लोक मेले असते.
ट्रम्प यांचे नवे आश्वासन : लस आणणार, सुरक्षित भविष्य देणार
दरम्यान, ट्रम्प यांनी महामारी बघता आपल्या निवडणूक माेहिमेत कोरोना लसचाही समावेश केला आहे. फाॅक्स न्यूजसोबतच्या चर्चेत त्यांनी सांगितले, आम्ही पुढील वर्षापर्यंत कोरोना लस तयार करून घेऊ आणि प्रत्येक अमेरिकनला विषाणूपासून सुरक्षित करू म्हणजे सर्वांना एक चांगले भविष्य देता येईल. ट्रम्प यांच्या या वक्तव्याकडे अमेरिकन माध्यमांमध्ये निवडणुकीत आश्वासन म्हणून बघितले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.