आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांचे हाल:पॅरिस विमानतळावर कर्मचारी संपावर; 100 उड्डाणे रद्द

पॅरिस25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड, नेदरलँडनंतर फ्रान्समध्येही उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले. विमान कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ आली. रोइस चार्ल्स-डी गाॅल व आेर्लीचे कर्मचारी आपल्या मागण्यांवर अडून बसले आहेत. कोरोनापूर्व काळातील विमान व्यवस्थेच्या तुलनेत विमान सेवा ९५ टक्के क्षमतेने काम करू लागली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने आमच्यावर कामाचा ताण वाढला आहे, असे असूनही नवीन भरती किंवा वेतनवाढ हाेत नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ग्राउंड स्टाफच्या संपामुळे गुरुवारी १०० हून जास्त उड्डाणे रद्द करावी लागली .

15 हजार कर्मचाऱ्यांनी दोन वर्षांत नोकऱ्या गमावल्या. 95 टक्के क्षमतेने विमानसेवा सुरू, नियुक्त्या, वेतनवाढ रखडली

बातम्या आणखी आहेत...