आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘स्टॉकरवेअर’ प्रचंड धोकादायक; कॅलेंडर अ‍ॅपसारखे दिसणारे अन् अ‍ॅपल, गुगलला डोकेदुखी ठरलेले अ‍ॅप्स पडद्याआड करतात चक्क हेरगिरी

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंबातील व्यक्तींची ऑनलाइन निगराणी करणाऱ्या सॉफ्टवेअर्समुळे वाढू शकतात अडचणी इंग्रजीत एक शब्द आहे “स्टॉकर’. याचा अर्थ आहे, “गुपचूप पाठलाग करून शिकार करणारा.’ आपल्या कॉम्प्युटर व मोबाइलमधील अनेक अॅप्लिकेशन्स व सॉफ्टवेअर सध्या हे काम करत आहेत. उदा. मी आठवड्यापूर्वी मोबाइलमध्ये “फ्लॅश किलॉगर’ डाऊनलोड केले. माहितीत लिहिले होते की, अॅप कुटुंबातील सर्वांसाठीच ऑनलाइन निगराणीसाठी मदतनीस ठरेल. परंतु, डाऊनलोड केल्यानंतर जाणवले की, वास्तविक या अॅपने माझ्या खासगी जीवनातील सर्वच माहिती मिळवली आहे. मी केव्हा कुठे जातो, काय करतो हे सारेच अॅपला माहिती झाले आहे.

वास्तविक, फोनवरील माझा प्रत्येक की स्ट्रोक हे फ्लॅश किलॉगर रेकॉर्ड करत होते आणि मीच त्याच्या निगराणीत आलो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर मीच त्यांच्या जाळ्यात अडकून शिकार झालो. म्हणूनच असे सॉफ्टवेअर, अॅपला आता “स्टॉकरवेअर’ संबोधले जाऊ लागले आहे. गुगल अॅप स्टोअरवर असे भरमसाट अॅप आहेत. अॅपल स्टोअरवरही काही सापडतात. डाऊनलोड केल्यावर हे अॅप्स कॅलेंडर किंवा कॅलक्युलेटरसारखे दिसतात. मात्र, असतात प्रचंड धोकादायक. काही वर्षांपूर्वी ही संख्या शेकडोत होती, आता हजारांत आहे. यांची नावेही वेगवेगळी, उदा. मोबाइल टूल, एजंट, सर्बरस अशी आहेत. यांना आता गुगल आणि अॅपलही एक समस्या मानू लागले आहेत.

अमेरिकेत ९ महिन्यांत ६३ टक्के वापर वाढला : गेल्या काही दिवसांत नॉर्टनलाइफलॉक नामक सुरक्षा एजन्सीने केलेल्या सर्व्हेत म्हटले होते की, गेल्या सप्टंेबरपासून मेपर्यंत स्टॉकरवेअरचा वापर ६३ टक्के वाढला आहे. यादरम्यान अमेरिकेच्या व्यापारविषयक आयोगाने सपोर्ट किंगनामक अॅप निर्मात्यावर बंदी घातली आहे. कदाचित ही अशा प्रकारची पहिली कारवाई असेल. डिजिटल अधिकार संघटना “इलेक्ट्रॉनिक्स फ्रंटियर फाउंडेशन’च्या इव्हा गॉलपेरिन म्हणतात, ही सर्वात वाईट अवस्था आहे. आपल्या प्रत्येक क्षणाची हेरगिरी होत आहे.

दैनिक भास्करशी विशेष करारांतर्गत
“स्टॉकरवेअर’ कॉल, लोकेशन, फोटो रेकॉर्ड करतात. आपण फोन किंवा कॉम्प्युटरवर जे काही टाइप करताे ते सर्व रेकॉर्ड करून आपल्या फायद्यासाठी वापरतात. तज्ज्ञांनुसार, मोबाइल, लॅपटॉपची बॅटरी वेगाने उतरत असेल तर समजून घ्या कोणता तरी “स्टॉकरवेअर’ आला आहे. याशिवाय एखादी शंका आली तर ते अॅप डिलीट करण्याऐवजी त्याचा वापर थांबवून सुरक्षा एजन्सींना माहिती दिली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...