आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युझिक फेस्टिव्हलमधील चेंगराचेंगरीत 8 ठार:अमेरिकेत म्युझिक शो पाहण्यासाठी आलेल्या 50 हजार लोकांची गर्दी झाली अनियंत्रित, लोक एकमेकांना चिरडून पळाले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील टेक्सास येथील अॅस्ट्रोवर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सुमारे 300 जण जखमी झाले आहेत. ह्यूस्टन फायर चीफ सॅम्युअल पी यांच्या म्हणण्यानुसार, रॅपर ट्रॅव्हिस स्कॉट परफॉर्म करत असताना रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. 2019 मध्ये त्यांनी हा महोत्सव सुरू केला होता.

हा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळपास 50 हजार लोक जमले होते. कार्यक्रमादरम्यान मोठा जमाव स्टेजच्या दिशेने जाऊ लागला. यामुळे काही लोक घाबरले आणि धक्काबुक्की करू लागले. काही लोक पळू लागले तर काही लोक बेशुद्ध पडले. त्यामुळे संगीत महोत्सवात प्रचंड गोंधळ उडाला.

11 जणांना हृदयविकाराचा झटका
या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे पेना यांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. 300 जण जखमी झाले असून त्यापैकी 23 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 11 जणांना हृदयविकाराचा झटका आला. ह्यूस्टन पोलिसांनी सांगितले की ते घटनेचे कारण शोधण्यासाठी व्हिडिओ फुटेज पाहत आहेत.

प्रवेशाच्या वेळीही तेच दृश्य होते
या उत्सवात प्रवेशाच्या वेळीही लोकांची अशीच धावपळ सुरू होती. लोकांनी प्रवेशासाठी बॅरिकेड्स तोडले. यानंतर सर्वजण एकमेकांना ढकलत, एकमेकांच्या अंगावर चढून उत्सवात प्रवेश करू लागले. यादरम्यान अनेक लोक जमिनीवर पडले तर काहीजण त्यांच्या अंगावरून जात राहिले.

बातम्या आणखी आहेत...