आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अनेकदा लोक जुना हिशेब चुकता करण्यासाठी सूड उगवतात. सूड उगवल्यानंतर मनाला दिलासा मिळायलाच पाहिजे असे नाही. अमेरिकी अब्जाधीश उद्योगपती एरिक बेकर यांच्याप्रमाणे सूड घेतल्यानंतर माणूस बरबादही होतो. गेल्या वर्षी ११ हजार कोटी रुपयांहून जास्तीचा महसूल देणाऱ्या कंपनीचे मालक बेकर सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. त्यांच्या या नाट्यमय कथेमागे त्यांची सूडबुद्धी हे आहे. अमेरिकेतील एरिक बेकर-हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर ्सिटीतून शिकले. एका आजोबाचा रिअल इस्टेट व्यवसाय, एक सुरक्षा कंपनी जी शस्त्रसज्ज कारचे संचालन करते. कुटुंबाप्रमाणे बेकर यांनीही शिक्षणानंतर व्यवसायात पाऊल ठेवले. बेकर यांनी मित्र जेफ फ्लुहरसोबत अमेरिकेत तिकीट एक्स्चेंज आणि तिकीट रिसेलची कंपनी स्टबहब सुरू केली. ही कंपनी स्पोर्ट्स, म्युझिक, थिएटर आणि अन्य लाइव्ह इव्हेंटचे तिकीट खरेदी करणे आणि विकण्याची सेवा देत होती. कंपनीने २००१ मध्ये बेसबॉल टीम सिएटल मेरीनेर्ससोबत करार केला. २००४ मध्ये बेकरना कंपनीतून बाहेर काढण्यात आले. याच्या २ वर्षांनंतर बेकर यांनी लंडनमध्ये वियागोगो नावाने तिकीट एक्स्चेंज आणि रिसेलची कंपनी पुन्हा सुरू केली. कंपनीचा इंग्लिश क्लब चेल्सी आणि मँचेस्टर युनायटेडसोबत करार झाला. २०१३ मध्ये वियागोगोने ऑस्ट्रेलियात व्यवसाय सुरू केला. तेथील एएफएल क्लब कॉलिगवूड एफसी आणि रिचमंड एफसीसोबत कंपनीचा करार झाला. दुसरीकडे, २००७ मध्ये स्टबहबची ऑनलाइन लिलाव सेवा ईबेने अधिग्रहण केली. काळानुरूप बेकर अब्जाधीश उद्योगपती झाले, मात्र त्यांच्या मनात जुन्या कंपनीतून काढण्याची सल कायम होती. २०१९ च्या अखेरीस एरिक बेकर यांच्या वियागोगोने स्टबहबला ४.०५ अब्ज डॉलर्स(सुमारे ३०हजार कोटी रु.)मध्ये खरेदी केलेजगभरात जास्तीत जास्त स्पोर्ट इव्हेंट रद्द झाले. गेल्या वर्षी ११ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल आणणाऱ्या कंपनीचा महसूल आता ९०% घटला आहे. कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.
दोन तृतीयांश कर्मचाऱ्यांना सुटी, मूडीजनेेे रेटिंग नकारात्मक केले
करार पूर्ण होण्याच्या काही आठवड्यांनंतर कोरोनामुळे इव्हेंट स्थगित होऊ लागले. वियागोगोचा करार टोकियो ऑलिम्पिक, युरो कप, मेजर लीग सॉकर, टी-२० वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ गेम्स, विम्बल्डन, यूएस ओपन आणि डब्ल्यूडब्ल्यूईसह अनेक मोठे इव्हेंट होते. इव्हेंटचे आयोजन सुरू झाले, मात्र फॅन्सविना. स्टबहब आणि वियागोगोच्या महसुलात ९०% पर्यंतची घट आली. स्टबहबने मार्चच्या अखेरीस अमेरिका ऑफिसच्या दोन तृतीयांश कर्मचाऱ्यांना सुटीवर पाठवले आहे. रेटिंग संस्था मूडीजने कंपनीला स्थिरवरून नकारात्मक स्तरात दाखवले. तिकिटांच्या बाजारावर लक्ष ठेवणारे सल्लागार एरिक फुलर म्हणाले, स्टबहब लवकरच दिवाळखोरीसाठी अर्ज करू शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.