आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिरिया, इराण आणि अफगाणिस्तान... जेथे खेळाबाबत विचार करणे दूरच, महिलांना घरातून बाहेर पडणेही कठीण आहे. अशा परिस्थितीत कुटुंब आणि देश सोडून या महिला खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या आयओसीच्या २९ सदस्यांच्या निर्वासितांच्या चमूत स्थान मिळवले. असा आहे त्यांचा संघर्ष...
माझी खिल्ली उडवली, कोच-सहकाऱ्यांना धमकीही मिळाली; पण मी सायकलिंग सोडले नाही : मासोमा
मी मूळची इराणची. तेथून हाकलल्याने कुटुंब अफगाणिस्तानमध्ये आले होते. येथे मला व बहिणीला वडिलांनी सायकल शिकवली. मी १६ व्या वर्षी राष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते. पण लोकांना ते आवडले नाही. मला कारने धडक देऊन खाली पाडले, खिल्ली उडवली. सहकाऱ्यांना व कोचला धमकीही देण्यात आली. दबावामुळे २०१७ मध्ये फ्रान्सला यावे लागले. आमच्या समुदायाद्वारे सायकल चालवणे बंद करण्याचा व लग्नाचा दबाव टाकण्यात आला. एक दिवस अफगाणिस्तानला परतेन आणि भव्य सायकल स्पर्धा आयोजित करेन. -मासोमा अली जादा
एकमेव ऑलिम्पिक पदक विजेती होते, पण महत्त्व मिळाले नाही, खेळासाठी देश सोडला : किमिआ
रिअो ऑलिम्पिकमध्ये तायक्वांदोत कांस्यपदक जिंकून मी इराणसाठी इतिहास घडवला होता. मी देशाची एकमेव महिला ऑलिम्पिक पदक विजेती होते. २०१६ मध्ये पदक जिंकून इराणला पोहोचले तेव्हा मानसन्मान मिळत होता, पण तो बाह्य देखावा होता. सरकारसाठी आमचे महत्त्व नव्हते. आम्ही त्यांच्यासाठी वापर होणारे शस्त्र आहोत. माझ्यावर मानसिक दबाव होता, लग्नानंतर टोकले जात होते. मी माझा खेळ आणि स्वातंत्र्यासाठी इराण सोडून जर्मनीत राहण्याचा निर्णय घेतला आणि ऑलिम्पिकची जिद्द कायम राखली. -किमिआ अलीजादेह
पती व मुलाला सिरियात सोडून युरोपमध्ये आले, ६ महिने निर्वासित छावणीत राहून प्रशिक्षण : सँडा
ऑलिम्पिकसाठी २०१५ मध्ये पती फदी दर्विश (कोचही आहे) आणि मुलाला सिरियात सोडून नेदरलँड्सला आले. तेथे निर्वासित छावणीत राहावे लागले. युरोपात जाऊन ज्युडोचे प्रशिक्षण घेणे आव्हानात्मक होते. कुटुंबापासून दूर राहिल्याने निराश होते. पण काही केले नसते तर वेड लागले असते. रनिंग-व्यायामात झोकून दिले. ६ महिन्यांनंतर कुटुंबाची साथ मिळाली. आणखी दोन मुले झाली. २०१९ व २०२१ मध्ये वर्ल्ड ज्युडो आणि ग्रँड स्लॅममध्ये भाग घेतला. ऑलिम्पिकच लक्ष्य होते. आई, तुला ऑलिम्पिक खेळायचे आहे, असे तिन्ही मुले सांगत होती. - सँडा अल्डास
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.