आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा३४ वर्षीय क्लाउडिया कॅम्पाेस एक कार रेंटल कंपनीत काम करतात. लस घेतल्यानंतरही प्रत्येक काम त्या मास्क परिधान करून करतात. त्यांनी मास्क प्रिंट देखील करून घेतला आहे. त्यावर त्यांनी काही गाेष्टी लिहिल्या आहेत. ‘मी लस घेतलीय. परंतु तुमच्यावर विश्वास ठेवण्यास मी तयार नाही’. कॅम्पाेस यांचे घाेषवाक्य त्यांच्यासारख्या अनेक अमेरिकी लाेकांच्या भावना व्यक्त करणारे आहे.
लस घेतल्यानंतरही अनेक अमेरिकी सुरळीत जीवन जगण्याविषयी उदास दिसू लागले आहेत. अमेरिकेत आतार्यंत ४४ टक्के लाेकांनी पूर्ण लस घेतली आहे. या लाेकांना प्रवासादरम्यान मास्क काढण्याची परवानगी आहे. त्याचबराेबर परस्परांना भेटू देखील शकतात. परंतु त्यापैकी बहुतांश लाेक सामान्य जीवन जगण्यास अद्यापही तयार नाहीत. मार्चमध्ये अमेरिकेच्या सायकाॅलाॅजिकल असाेसिएशनच्या पाहणीत सहभागी निम्मे लाेक म्हणाले, लस घेतल्यानंतरही लाेक परस्परांत मिसळणे टाळू लागले आहेत.
२५ मे राेजी झालेल्या पाहणीत लस घेतलेले निम्म्यांहून जास्त लाेक म्हणाले, अजूनही घराबाहेर पडताना मास्क घालताे. फायझर व माॅडर्नाच्या लस घेतलेल्या इतर लाेकांच्या तुलनेत संसर्ग हाेण्याची शक्यता ९१ टक्के कमी आहे. त्यांना संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यापासून इतरांना बाधा हाेण्याची शक्यताही खूप कमी आहे.
नियमांची धरसाेड कठीण वाटतेय
अमेरिकेत दरराेज हजाराे लाेक काेराेना पाॅझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे लस घेतलेल्या लाेकांना लस न घेतलेल्या लाेकांमध्ये मिसळण्याबाबत भीती दिसते. समाजात केवळ एका वर्षात नवा सामाजिक नियम लागू झाला. ताे स्वीकारायचा आणि लगेच ताे साेडून पुन्हा जुन्या नियमाने राहायचे ही गाेष्ट स्वीकारण्याची अपेक्षा चुकीची ठरते, असे इंडियानाच्या मेंटर हेल्थ काैन्सिलर राॅब डँजमॅन यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.