आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फ्रान्स:12 तासांमध्ये वर्षभराएवढा पाऊस; शेकडो घरांचे नुकसान, 1500 फायरफायटर्स बचाव कार्यासाठी तैनात

पॅरिस21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा सामना करणाऱ्या फ्रान्समध्ये १२ तासांत विक्रमी १९.७ इंच पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे बहुतांश भागांत पूरस्थिती निर्माण झाली. याच्या तडाख्यामुळे १०० पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले. दुसरीकडे, २५ लोकांचा मृत्यू झाला असून २० जण बेपत्ता झाले आहेत. शेकडो वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. फ्रान्समधील हवामान विभागानुसार, दक्षिण-पूर्वेकडील फ्रान्समध्ये अॅलेक्स या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला. यामुळे नाइस शहराच्या डोंगराळ भागात पूर आला. दुसरीकडे पावसामुळे इटली आणि जर्मनीमध्येही मोठा परिणाम झाला आहे. इटलीत अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून १६ जण बेपत्ता आहेत.

रस्त्यांवर 5 फुटांचा ढिगारा; 1500 फायरफायटर्स बचाव कार्यासाठी तैनात
नाइस शहराची लोकसंख्या सुमारे ३.५ लाख आहे. येथील महापौर क्रिश्चियन एस्टोर्सी यांनी सांगितले, या पुरामुळे शहराला मोठा फटका बसला आहे. सेंट मरीन आणि ब्रेल सुर रोवासारखे अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत. रस्त्यांवर पाच फूट ढिगारा साचला आहे. जेसीबी मशीनद्वारे ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे. शहरात बचावकार्यासाठी १५०० पेक्षा जास्त अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात आहेत.