आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माथेफिरूचे चाकूहल्ले:कॅनडात रस्त्यावर चाकूहल्ले; दहा जणांचा मृत्यू, 15 जखमी, संपूर्ण प्रांतात अलर्ट जारी

ओटावा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडाच्या सस्कॅचेवानमध्ये चाकूहल्ल्याच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक स्थानिक समुदाय आणि आणखी एका शहरात झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटनांत १० जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. कॅनडाच्या पोलिसांनी सांगितले की, जेम्स स्मिथ क्री नेशन आणि सास्काटूनच्या ईशान्येकडील वेल्डन गावात किमान १३ ठिकाणी चाकूहल्ल्याच्या घटना घडल्या. या सर्व ठिकाणी हल्ल्यात जखमी झालेले आणि मृत लोक आढळले आहेत.

आरसीएमपी सस्कॅचवानच्या सहायक आयुक्त रोंडा ब्लॅकमेलर यांनी सांगितले की, काही संशयित लोकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यांमागील कारण समजू शकले नाही. पोलिसांनी या हल्ल्यांसाठी डेमियन सँडरसन आणि माइल्स सँडरसन यांना जबाबदार ठरवत त्यांची छायाचित्रेही जारी केली आहेत. काही सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यावरून हल्लेखोर कारमधून फिरत चाकूने हल्ला करत होते. त्यानंतर संपूर्ण प्रांतात अलर्ट जारी करण्यात आला. पहिल्या घटनेची माहिती स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी ५.४० वाजता मिळाली. सस्कॅचवानमध्ये किमान १३ ठिकाणी पीडित आढळले आहेत. कॅनडात ही अलीकडच्या वर्षांतील सर्वात मोठी घटना आहे.

बातम्या आणखी आहेत...