आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:तणाव, कुटुंब कलह, उणिवांमुळे महिलांत केवळ एकच अपत्य जन्माला घालण्याची क्षमता : संशोधनाचा निष्कर्ष

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मँचेस्टरच्या अभ्यासाआधारे जन्मदर स्थिर ठेवण्याचे यूके सरकारचे लक्ष्य

मानसिक तणाव, कौटुंबिक कलह, उणिवा किंवा बेरोजगारीचा सामना करणाऱ्या गरोदर महिला केवळ एक अपत्य जन्माला घालू शकतात, अशी शक्यता मांडणारा निष्कर्ष मँचेस्टर विद्यापीठाच्या अभ्यासातून समोर आला आहे. दरम्यान, अभ्यासाच्या आधारे जन्मदर स्थिर करून व गर्भातच होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण २०२५ पर्यंत ५० % घटवण्याचे यूके सरकारचे लक्ष्य आहे.

दुसरीकडे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या सर्वेक्षणानुसार, ५०% पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या देशांत यूके २४ व्या स्थानी आहे. येथील १८ ते ३४ वर्षीय ५० ते ६०% युवकांनी कुटुंब नियोजन एक ‌वर्षासाठी टाळले आहे. अनिश्चिततेच्या स्थितीत कुटुंब नियोजन करणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. कोरोना दुष्टचक्रात महिलांत पर्सनॅलिटी डिसऑर्डरची समस्या वेगाने वाढत आहे. यामुळे त्या तणावालाही ब‌ळी पडत आहेत.

रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्ट्सच्या गर्भावस्थेच्या काळातील मानसोपचारतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ. ट्रूडी सिनेव्हिर्तने सांगतात की, गर्भावस्थेत तणाव जास्त असतो. यामुळे महिलांना तणावमुक्त न केल्यास प्रसूतीच्या वेळीही तणाव राहण्याची शक्यता असते. तसेच गर्भावस्थेत तणावमुक्त असणाऱ्या मातांच्या तुलनेत तणावात असणाऱ्या महिलांच्या मुलांना पर्सनॅलिटी डिसॉर्डरची समस्या भेडसावण्याची शक्यता १० पटीने जास्त असते.

दुसरीकडे, युनिसेफच्या अहवालानुसार, कोविड-१९ महामारीपूर्वीही जगात सुमारे २८ लाख गरोदर महिला व शिशूंचे मृत्यू झाले आहेत. अशा वेळी गर्भावस्थेत माता व अर्भकांचा होणारा मृत्यू रोखण्यासाठी सर्व देशांना आवश्यक असलेली औषधी व देशातील आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यास सांगण्यात आले आहे.

भारतात जन्मदरात वेगाने घट, मात्र आयुर्मानातही वाढ
भारतात एकीकडे जन्मदरात वेगाने घट होत आहे. मात्र, दुसरीकडे नागरिकांचे आयुर्मानही वाढत आहे. लोकांना दीर्घायुष्य लाभले खरे परंतु हे आयुष्य पूर्ण निरोगी नाही. आजारही वाढले आहेत. २०१७ च्या आकडेवारीनुसार, देशातील जन्मदर २.२४ आहे. मात्र, देशात अशीही काही राज्ये आहेत, जेथे जन्मदर वाढल्यामुळे लोकसंख्येतही वाढ होत आहे. याबाबत बिहार आघाडीवर आहे. येथील जन्मदर ३.२ एवढा आहे. देशात युवकांचे प्रमाण सर्वाधिक ५७.२% आहे. तर, दुसऱ्या स्थानी असलेल्या उत्तर प्रदेशात २.९ ‌एवढा जन्मदर आहे.