आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:चौथ्या लाटेपासून बचावासाठी युरोपीय देशांत लस टाळणाऱ्यांवर कडक निर्बंध

रोम / जेसन होरोविट्ज19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • थंडीचा कडाका वाढताच युरोपात कोविड संसर्गाचा धोकाही वाढला

युरोपात पारा घसरू लागताच कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. याबरोबरच चौथ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी युरोपीय देश लस न घेणाऱ्यांच्या विरोधात कडक निर्बंध लागू करत आहेत. दोन आठवड्यांपासून ऑस्ट्रियात कोविडच्या नव्या रुग्णांचे प्रमाण १३४ टक्के वाढले. त्यामुळे ऑस्ट्रिया सरकारने १२ वर्षांहून जास्त वयाच्या समुदायासाठी आणखी कडक नियम केले आहेत. अशा समुदायातील लोकांचा प्रवास, शाळा, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी यावर मर्यादा आणल्या आहेत. ऑस्ट्रियाचे चान्सलर अलेक्झांडर शालेनबर्ग म्हणाले, ऑस्ट्रियाच्या नागरिकांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही तत्परतेने काम करत आहोत.

अॉस्ट्रियाचे पाऊल युरोपातील सरकारसाठी एक पॅटर्न ठरले आहे. यातून लोकांना एक डोस घेण्यासाठी प्रेरणा मिळावी असे सरकारला वाटते. कारण जीवन कठीण होत चालले आहे. युरोपीय देशांनी ही उपययोजना हाती घेतली. यावरून या क्षेत्रात संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याचे हे संकेत मानले जातात. पुन्हा एकदा युरोप कोविडचे केंद्र ठरू लागल्याचा इशारा गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. काही महिन्यांत या विषाणूमुळे ५ लाखांवर मृत्यू होण्याचा धोकाही व्यक्त करण्यात आला आहे. युरोपात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत कोविडमुळे होणाऱ्या मृतांचे प्रमाण १० टक्के तर नव्या रुग्णसंख्येत ७ टक्के अशी वाढ दिसून आली आहे. बहुतांश प्रकरणात युरोपातील देशांत वाढले आहेत. परंतु नव्या लाटेने संपूर्ण खंडात आर्थिक सुधारणा कार्यक्रम व नाताळच्या सुट्यांवर संक्रांत येऊ शकते, असे चित्र आहे. लसीकरण मोहीम राबवण्यात आली परंतु डोस न घेणाऱ्या लोकांमुळे आता वेगाने धोका वाढू लागला आहे. त्यामुळेच सरकार लस न घेणाऱ्या लोकांवर आता सक्ती करू लागले आहे.

व्हिएना मेडिकल विद्यापीठातील प्रोफेसर इवा श्वेत्झहॅमर म्हणाल्या, ऑस्ट्रियाच्या नव्या नियमांमुळे लस घेणारे व लस टाळणारे यांच्यातील संपर्क कमी होईल. अशाच प्रकारे जर्मनीमध्ये आगामी सरकारने देखील एक घोषणा केली आहे. लस न घेणाऱ्या लोकांवर कडक कायदा लागू केला जाईल, अशा शब्दांत सरकारने इशारा दिला. त्यानुसार जर्मनीत लोकांना बस किंवा रेल्वेेने प्रवास करण्यापूर्वी कोविडचा निगेटिव्ह अहवाल दाखवणे अनिवार्य ठरेल. फ्रान्समध्ये हेल्थ पास मिळेल, अशी आशा असलेल्या ६५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी बूस्टर शॉट गरजेचा असेल. इटलीत कामावर जाण्यापूर्वी कोविड चाचणी अनिवार्य असेल.एवढे केल्यानंतरही ऑस्ट्रियाची नवी उपाययोजना युरोपातील नेत्यांना रुचलेली नाही.

युरोपात रोमानियात सर्वात कमी लसीकरण झाले. बुल्गारियात रुग्णालयांत खाटाही शिल्लक नाहीत. लॅटेव्हियामध्ये लसीकरणास विरोध होत आहे. रशिया, युक्रेनमध्ये लसीकरणाचे प्रमाण ५० टक्क्यांहून कमी आहे.

ब्रिटनमध्ये बूस्टर डोस देणार, किशोरवयींनाना दुसरा डोस
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, या क्षेत्रावर वादळ येण्याची चिन्हे दिसत असल्याने चिंता वाटते. नव्या लाटेमुळे अनेक देशांना नवे कायदे लागू करावे लागले आहेत. ब्रिटनमध्ये चाळिशीतील लोकांना बूस्टर दिला जाईल. १६ ते १७ वर्षीय मुलांना दुसरा डोसही दिला जाईल.

फिलिपाइन्समध्ये १२० शाळांत अध्ययनाला सुरुवात
फिलीपीन्समध्ये २० महिन्यानंतर मुले शाळेत परतली. शाळा सुरू करणारा हा अखेरचा देश असल्याचे मानले जाते. पहिल्या दिवशी प्रायोगिक तत्वावर देशभरात १२० शाळा सुरू झाल्या. मास्क व फेसशील्डसह आलेल्या मुलांना प्लास्टिकच्या क्युबिकमध्ये बसवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...