आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पेनने लॉकडाऊनमध्ये सूट देत कोरोनालाही अटकाव करण्यात यश मिळवले आहे. येथे नवे रुग्ण आणि रोज होत असलेले मृत्यू तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर आहेत. या आठवड्यात दोन दिवस तर असे होते की एकही मृत्यू झाला नाही. देशातील ५२ टक्के भाग अनलॉकच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आहे. माद्रिदमधील सर्वात प्रसिद्ध रेस्तराँ डोनकिलोचे मालक कार्लाे म्हणतात, “आता सामान्य जनजीवन परतू लागले आहे. कारण, लोकांनी नियमांचे काटेकोर पालन केले आणि प्रशासनाने देखरेख केली.’
१५ मार्चपासून आतापर्यंत शिस्त बाळगण्यासाठी रोज सरासरी १५ हजार लेाकांना दंड ठोठावण्यात आला. २१ वर्षीय विद्यार्थिनी अन्ना म्हणते, “बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य ही मोठी गोष्ट आहे.’ येथे उद्योग आिण व्यापार क्षेत्र अजूनही संघर्ष करत आहेत. मात्र, बाजारपेठा उघडल्याने लोकांना “न्यू नॉर्मल’मध्ये परतण्यास मदत होत आहे. जोवर लस येत नाही तोवर हे न्यू नॉर्मल आता जीवनाचा अविभाज्य भाग राहील.
स्पेनमध्ये केवळ ५% लोकसंख्या विषाणूबाधेच्या संपर्कात आली
सर्पोप्रव्हलेन्सच्या अभ्यासानुसार, केवळ ५% लोकसंख्याच विषाणूबाधेच्या संपर्कात आली आहे. या संस्थेने ६० हजारहून अधिक लोकांच्या रँडम टेस्ट करून हे विश्लेषण केले. येथे आतापर्यंत २६ लाख टेस्ट झाल्या आहेत. १ हजार लोकांत ५३.८ लोकांच्या टेस्ट झाल्या आहेत. आतापर्यंत स्पेनमध्ये २,८८,३९० बाधित असून यात २७ हजार मृत्यू झाले आहेत.
कॉन्टॅक्टलेस सिस्टिम
हॉटेल, रेस्तराँमध्ये पेपर मेन्यूऐवजी क्यूआर कोड आणि डिजिटल पेमेंट
- हॉटेल, बार-रेस्तराँ, दुकाने इत्यादी ठिकाणी कॉन्टॅक्टलेस सिस्टिम विकसित करण्यात आली. पेपर मेन्यूऐवजी क्यूआर कोड डेव्हलप केले. ऑनलाइन बुकिंगवरच प्रवेश दिला जात आहे.
- दुकानांत चेंजिंग रूम बंद करण्यात आले. चप्पल-बुटांच्या दुकानांत माप घेण्यासाठी डिस्पोजल प्लास्टिक बॅग दिल्या जात आहेत.
- जागोजाग हात धुण्यासाठी वॉशिंग स्टेशन उभे आहेत. बार चालवणाऱ्या २५ लाख लोकांना डिस्टन्सिंग राखावे म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.