आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई:ख्रिसमस काळात संप; प्रवाशांची गैरसोय, 2 लाखांवर कर्मचारी कामापासून दूर राहणार

ब्रिटन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये गेल्या ३० वर्षांतील सर्वात मोठा संप होत आहे. यामध्ये विमानतळ, रुग्णवाहिका,नर्सिंग आणि पोस्टल कर्मचाऱ्यांसह अनेक विभागातील कर्मचारी सहभागी होतील. विशेष म्हणजे, संप ख्रिसमसच्या सुट्यादरम्यान होत आहे. यामुळे ब्रिटनमध्ये येणाऱ्या पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ख्रिसमसदरम्यान येथील पर्यटकांत वाढ होते. मात्र, या वेळी फार उत्साह पाहायला मिळत नाही. रस्त्यावर झगमगाटाऐवजी गर्दी दिसत आहे. ही गर्दी महागाईचा फटका सहन करत आहे. प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांची स्वतंत्र मागणी आहे. मात्र, सर्वांची समान मागणी पगारवाढीची आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या वेगाने महागाई वाढत आहे, त्या गतीने आमचा पगार वाढत नाही. ब्रिटनमध्ये महागाई दर ११.१% आहे, नर्सिंग स्टाफच्या वेतनात ४% वाढ झाली आहे. टपाल कर्मचाऱ्यांना ९% वेतनवाढीची ऑफर दिली. मात्र, कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ अद्यापही महागाई दरापेक्षा कमी असल्याचे कारण ते ती फेटाळण्यात आली. पहिला संप ७ डिसेंबरला शिक्षकांकडून केला.

वेतनवाढीसोबत पेन्शनमध्येही वाढ करावी,अशी त्यांची मागणी होती. २३ ते २६ डिसेंबर आणि २८ व ३१ डिसेंबरला एअरपोर्ट स्टाफ बॅटविक, हिथ्रो, मॅनचेस्टर, बर्मिंहॅम, ग्लासगो आणि कार्डिफमध्ये संप होईल. ८ दिवस चालणाऱ्या या संपाचा फटका टाळण्यासाठी सरकारने विमानतळ आणि बंदरांवर लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांऐवजी सैनिक काम करू शकतील. ब्रिटनमध्ये सुमारे ४० हजार रेल्वे कर्मचारी १३ ते १७ डिसेंबरदरम्यान संपावर जातील. यामुळे ब्रिटनच्या ५०% रेल्वे सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. १५ आणि २० डिसेंबरला सुमारे १ लाख परिचारिका संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, रुग्णालयातील आपत्कालीन सेवा सुरू राहतील.

५९% ब्रिटिश लोकांचा नर्सेच्या संपाला पाठिंबा असल्याचा इप्सोस नामक संस्थेचा सर्व्हे आहे. १० हजार रुग्णवाहिका कर्मचारीही २१ आणि २८ डिसेंबरला संपावर जातील. याआधी एवढ्या प्रमाणात जवळपास ३० वर्षापूर्वी म्हणजे १९८९ मध्ये संप झाला होता. त्यावेळचा संपही रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांकडून वेतनवाढीसाठी करण्यात आला हाेता.

आधीचा बंद यशस्वी,आताही हीच अपेक्षा ऑक्टोबरमध्ये गुन्हेगारी प्रकरणांच्या वकिलांचे वेतन १५% वाढले. यासाठी त्यांनी संप केला होता. यामुळे अन्य विभागांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे.

प्रवाशांच्या अडचणीमुळे विधेयक आणले सभागृहात संपादरम्यान प्रवाशांना होणाऱ्या अडचणी पाहता पंतप्रधान ऋषी सुनक यांनी विधेयक सादर केले. परिवहन सचिव मार्क हार्पर म्हणाले, या विधेयकाने भविष्यात संपकाळात प्रवाशांना फायदा मिळेल. त्यांच्यासाठी किमान सुविधा जारी राहतील.

जास्त करामुळे सुनक यांच्यावर लोक नाराज पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासमोर आव्हान आहे. ब्रिटनमध्ये कर दर वाढत आहेत. मात्र, सुनकनुसार हे निर्णय योग्य आहेत. कमी वेतनात कर जास्त का?असे लोक म्हणतात. यामुळे ते सुनक यांच्यावर नाराज असून त्यांची लोकप्रियता घटली आहे.

सुनक यांच्यासमोर मोठे आव्हान, लोकप्रियता घटली शनिवारी बस स्टाफने संप केला. यादरम्यान बससेवेवर परिणाम झाला होता.

बातम्या आणखी आहेत...