आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असंतोष:थायलंडमध्ये राजधानी बँकॉकच्या नामांतराला तीव्र विरोध, प्रचलित नाव राजघराण्याशी जोडल्याबद्दल जनता नाखुश

बॅँकॉक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थायलंडची राजधानी बँकॉकमधील नोई जिल्ह्यातील जिंताना रेपसोमरुए यापुढे आर्थिक अडचणींमुळे तिचा आवडता नाष्टा करू शकत नाही. लाखो थाई लोकांप्रमाणे महामारीमुळे तिचे उत्पन्नही निम्मे झाले आहे. श्रीमती जिंताना म्हणतात, “मला आश्चर्य वाटते की, लोक आर्थिक स्थितीऐवजी राजधानीचे नाव बँकॉकवरून क्रंग थेप महा नखोन असे बदलण्यावरून वाद घालत आहेत.” मी सरकारचा प्रमुख असतो तर राजकीय कारणांसाठी कोणत्याही नावावर आवाज उठवण्यापूर्वी जनतेची काळजी घेतली असती.

थाई भाषेचे अधिकृत संरक्षक असलेल्या रॉयल सोसायटी कार्यालयाने फेब्रुवारीमध्ये राजधानीचे नाव बँकॉकऐवजी क्रंग थेप महा नखोन असे ठेवण्याचा आदेश जारी केला. रॉयल सोसायटीच्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय उद्देशांसाठी वापरल्या जाणाऱ्या क्रंग थेप महा नखोन (बँकाॅक) या औपचारिक नावाने आता बँकॉकची जागा घेतली आहे. कंसाचा वापर नावाचे महत्त्व अधोरेखित करतो, असे सोसायटीचे उप सरचिटणीस सांती फकिडहाम सांगतात. २०१४ च्या लष्करी उठावानंतर पंतप्रधान झालेल्या प्रयुथ चान ओछा यांच्या सरकारने कोष्टकासह नावाचा कायदा लागू केला.

नावातील बदलामुळे लोकांमध्ये असंतोष आहे. मोठ्या संख्येने लोकांनी आता राजेशाही संस्थांच्या आदेशाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. इतिहासकार चार्नविट कसेटसिरी म्हणतात, बँकॉकऐवजी क्रंग थेप वापरणे मूर्खपणाचे आहे. उच्चवर्गीय लोकांना वास्तविक थाई नावाच्या जागी असे बदल हवे आहेत. ते म्हणतात, गत काही वर्षांत थाई शहरांच्या नावांतील बदलांमुळे स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. उदा. कोराटचे नाव पूर्वी नखोन रटचासिमा होते. मार्गफलकांवर सामान्य प्रचलित नावे आता कंसात टाकण्यात आली आहेत.

दुसरीकडे, प्रयुथ सरकारविरोधात असंतोष वाढत आहे. सरकारचे काही टीकाकार देश सोडून पळून गेले आहेत, काही मारले गेले आहेत. डझनभर सरकारविरोधी तरुण नेत्यांना अटक करण्यात आली आहे. राजघराण्यावरील टीकेमुळे खटले वाढले आहेत. गेल्या वर्षी एका माजी सरकारी अधिकाऱ्याला ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. राजघराण्याने संविधानाचे पालन करावे, असी मागणी करणाऱ्या काही राजकारण्यांना शेकडो वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. © The New York Times

बातम्या आणखी आहेत...