आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​मार्केटिंगने भीती पसरवून व्यवसाय वाढवला:अमेरिकेत आता लष्करी शैलीतील घातक शस्त्रांची जोरदार विक्री

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत पूर्वी कृषी मासिकांमध्ये शेतीची अवजारे म्हणून बंदुकीची जाहिरात केली जायची. आता बंदूक उद्योगाचे लक्ष त्यांच्या कुटुंबाच्या आणि मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी असलेल्या लोकांना लष्करी शैलीतील प्राणघातक शस्त्रे विकणे आहे. मार्केटिंगमधील हा बदल अमेरिकींच्या जीवनात घातक शस्रांच्या भूमिकेची झलक देतो. १९व्या शतकात बंदूक उत्पादकांनी कनेक्टिकट व्हॅली आणि न्यूयॉर्क राज्यात तळ निर्माण केले. रशियाच्या झार निकोलस आणि ओटोमन सुलतान यांसारख्या सम्राटांकडून अमेरिकन बंदुकांना सर्वाधिक मागणी आली. गनिंग ऑफ अमेरिका लेखिका पामेला हाग लिहितात, आम्ही साम्राज्यवाद्यांना शस्त्रे विकत होतो.

हा टप्पा संपल्यानंतर उद्योगाने आपले लक्ष स्वदेशी लोकांकडे वळवले. नवीन प्रकारचे खरेदीदार उदयास आले. एक नवीन प्रकारची जाहिरात दिसू लागली. कोल्टची विसाव्या शतकाच्या सुरुवातीस एक जाहिरात होती-ग्रामीण भागातील रस्त्यावर घेरावापासून बचाव करण्यासाठी तयार रहा. जाहिरातीत कार सीटच्या कुशनमध्ये किंवा महिलेच्या हँडबॅगमध्ये अडकलेले कोल्ट पिस्तूल दाखवले होते. हाग म्हणतात, बंदुकीची गरज दाखवण्यासाठी भीती निर्माण केली गेली.

१९१०मध्ये विंचेस्टरच्या जाहिरातींमध्ये म्हटले होते, शूर मुलांकडे स्वतःच्या बंदुका असाव्यात. बंदूक उद्योगाचे माजी कार्यकारी रायन बुसे म्हणतात, २१व्या शतकात बंदुकांच्या मार्केटिंग मोहिमेत मर्दानगी आणि भीती यांच्यातील संबंध नाटकीयपणे तीव्र झाले आहेत. १९९९मध्ये कोलंबाइन शाळेत गोळीबारात १३ लोक मारले गेल्यानंतर आधुनिक बंदूक उद्योगाचा जन्म झाला असे बुसे म्हणतात. बराक ओबामा अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर सरकार बंदुका जप्त करेल किंवा विक्रीवर बंदी घालेल असा खोटा प्रचार करण्यात आला. या काळात लष्करी शैलीतील बंदुका आणि एआर-१५ असॉल्ट रायफल विकण्यावर भर दिला होता. २०१२ मध्ये, रेमिंग्टनची उपकंपनी बुशमास्टरने मॅक्सिम मॅगझिनमधील एका लोकप्रिय जाहिरातीमध्ये म्हटले होते - “तुमच्या मर्दानगीची ओळख पुन्हा निर्माण झाली आहे असे समजा.”त्या वर्षी सँडी हुक स्कूलमध्ये बुशमास्टर रायफलने केलेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये, रेमिंग्टनने हुक शाळेतील मृत मुलांच्या पालकांना ५८१ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचा करार केला.

२०२० मध्ये एक कोटी बंदुकांची विक्री बंदुक तज्ज्ञ बुशे यांचा अंदाज आहे की शिकार आणि शूटिंगसाठी दरवर्षी ३० लाख ते ७० लाख बंदुका विकल्या जातात. महामारीमुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणामुळे २०२० मध्ये बंदुकांची विक्री १० लाख झाली. काही घातक बंदुका अधिक विकल्या. बंदूक उद्योगातील बहुतेक जाहिराती भीती पसरवण्यावर केंद्रित असतात.

बातम्या आणखी आहेत...