आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधकाधकीच्या जीवनात आम्ही अनेक वेळा नकारात्मक विचारांच्या भोवऱ्यात अडकतो. आपल्यासमोर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही विचार असतात. परंतु नकारात्मक विचार आपल्या मनाला आकर्षित करतात. आम्ही त्याविषयीच विचार करत राहतो आणि तो आपल्या मूडवरही परिणाम करू लागतो. हळूहळू हे नकारात्मक विचार आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू लागतात.
ब्रिटनच्या सरे येथील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. गुरप्रीतकौर म्हणाल्या की, आपले मनच आपल्याला उद्ध्वस्त का करू पाहतेय? त्या म्हणाल्या की, असे नकारात्मक पूर्वग्रहामुळे होते. यात लोक सकारात्मक विचारांच्या तुलनेत नकारात्मक विचारांवर अधिक लक्ष केंद्रित करतात. तथापि, हा स्वभाव बदलून आणखी चांगला केला जाऊ शकतो. डॉ. कौर यांच्या मते ‘आम्ही नैसर्गिकरीत्या नकारात्मकतेकडे बघण्यासाठी लवकर सज्ज हाेतो. कदाचित आपल्या पार्श्वभूमीमुळे तसे होत असावे. कारण आपल्याला मनुष्याच्या रूपात स्वत:ला जिवंत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे आपण एखाद्या गोष्टीतील सकारात्मकतेऐवजी त्यातील धोक्याकडे अधिक बघतो.’ म्हणजे आपले मन नकारात्मक विचारांवर स्थिर राहणे फायदेशीर ठरेल, असा विचार करते. पण वास्तव उलट असते. डॉ. कौर यांच्या मते, ‘असे असू शकते की आपले मन आपल्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असते. यासाठी आपल्याला त्याची निगराणी करणे शिकावे लागेल. ’ आपल्याला मनाला असा संदेश देण्याची गरज आहे की, हे कामाचे नाही. जेव्हा या नकारात्मक विचारांचा पॅटर्न बदलण्याची वेळ येते तेव्हा लोक सोपा मार्ग स्वीकारू शकतात. तो म्हणजे सकारात्मकतेवर लक्ष देण्याचा प्रयत्न करणे. कारण सकारात्मकतेविषयी विचार करणे सुरक्षित आहे, हे मेंदूला शिकवले गेले पाहिजे.
हा नकारात्मक विचार योग्य आहे का? तो कामाचा आहे का? हे स्वत:ला विचारा डॉ. कौर म्हणाल्या, ‘आपण जेवढे नकारात्मक विचारांविषयी विचार न करण्याचा प्रयत्न करतो, तेवढाच जास्त विचार करतो. आपण त्यापासून दूर पळत असतानाच अधिक जवळ जातो. यावर एकच उपाय असा की, त्या नकारात्मक विचारावर रचनात्मक पद्धतीने काम करावे, जेणेकरून आपण ही समस्या सोडवू शकू. कोणत्याही निर्णयावर पोहोचण्यापूर्वी विचारांची ओळख करणे शिकले पाहिजे.’ हा विचार योग्य आहे का? तो कामाचा आहे का? हे स्वत:ला विचारा. अशा रीतीने तुम्ही सकारात्मक विचारांपर्यंत पोहोचू शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.