आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:ब्रिटनमध्ये विद्यार्थी, भाडेकरू संपावर; म्हणाले- लॉकडाऊन काळात भाडे कसे द्यावे? आमचा संघर्ष जीव वाचवण्यासाठी आहे...

लंडन एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • लंडनमध्ये रेंट स्ट्राइक म्हणजे भाड्यासाठी संप सुरू, हजारो नागरिक सहभागी

लंडनच्या टर्नपाइक लेन स्थानकाच्या बाहेर लिहिलेले आहे की, आतापासून भाड्यासाठी संप. लंडनच्या बहुतांश रस्त्यांच्या बाजूला असेच संदेश लिहिले आहेत. हा संप घरभाडे भरण्याची परिस्थिती नसलेल्या आणि उपजीविकेसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुकारला आहे. विद्यार्थ्यांच्या संपात आता इतर भाडेकरूही सहभागी झाले आहेत. भाडे न फेडू शकल्यामुळे संकटात असलेले काही विद्यार्थी आपल्या सहकाऱ्यांसोबत राहत आहेत. येथेही घरमालक दुप्पट भाडे मागत आहेत. यामुळे लंडनमध्ये रेंट स्ट्राइक म्हणजे भाड्यासाठी संप सुरू झाला असून, यात हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. 

ठिकठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत भाडे देण्यासाठी मुभा मिळावी, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनुसार, आम्ही जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत आहोत. विद्यार्थ्यांनी आपल्या घरमालकांसोबत भाडे कमी करण्यासाठी किंवा अजिबात न देण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. तसेच विद्यापीठातून काढण्यात आलेल्या आणि भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तसेच नोकरी गमावलेल्या आणि स्वत:च्या कुटुंबांना वाचवण्यासाठी सेल्फ आयसोलेट झालेल्यांसाठीही हा लढा सुरू असल्याचे कॅनडातील एका विद्यार्थ्याने सांगितले. 

दरम्यान, बहुतांश विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे भाडे माफ करण्यात आले आहे. मात्र घरमालकांनी भाडे माफ करण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. आकडेवारीनुसार, केवळ १९ टक्के विद्यार्थी सध्या विद्यापीठाच्या परिसरात राहत आहेत. दुसरीकडे हाउसिंग असोसिएशन सेंच्युरीचे प्रवक्ते म्हणाले, विद्यार्थी नाराज आहेत, हे आम्हाला माहीत आहे. मात्र आम्ही के‌‌वळ विद्यार्थ्यांना सूट देऊ शकत नाही.

बाहेरच्यांवर जास्त परिणाम

सर्वाधिक अडचण शिक्षणासाठी कर्ज काढलेल्या विद्यार्थ्यांची आहे. मेंटेनन्स लोन घेणारे विद्यार्थीही त्रस्त आहेत. कारण यात घरभाड्याचा समावेश होत नाही. विदेशातील विद्यार्थी, जे पार्ट टाइम काम करून खर्च काढतात, त्यांच्यासाठी घरभाडे भरणे कठीण झाले आहे. कारण त्यांचे उत्पन्न बंद झाले आहे. कॅनडातील विद्यार्थिनी टामा नाइट सांगते, आम्हाला विद्यापीठ, घरमालक आणि सरकारने एकटे पाडले आहे. अशा परिस्थितीचा आम्ही कशा प्रकारे सामना करावा.

बातम्या आणखी आहेत...