आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या विद्यार्थीनीची हत्या:लंडन विद्यापीठात शिकणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह फ्लॅटमध्ये आढळला, ट्युनिशियन प्रियकर अटकेत

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या एका ब्रिटीश तरुणीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्यूनिशियाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, 19 वर्षीय सबिता थानवानीचा मृतदेह शनिवारी लंडनच्या क्लर्केंव्हेल भागातील आर्बर हाऊसमध्ये विद्यार्थींसाठी बांधण्यात आलेल्या प्लॅटमध्ये आढळला. तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. तपासात सबिता 22 वर्षीय महीर मारुफ याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलिसांनी रविवारी महीरच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी आरोपीने पोलिसांवर हल्ला केल्याचेही वृत्त आहे.

सविताचा मृतदेह आर्बर हाऊसच्या पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आढळला.
सविताचा मृतदेह आर्बर हाऊसच्या पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आढळला.

लंडन विद्यापीठाची होती विद्यार्थीनी

सबिता लंडन विद्यापीठात मानसशास्त्राचे शिक्षण घेत होती. ती प्रथम वर्षात शिकत होती. तिला शुक्रवारी शेवटचे मारुफसोबत पाहण्यात आले होते. सद्यस्थितीत तिच्या हत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. मेट्रोपोलिटन पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेच्या तपास अधिकारी लिंडा ब्रॅडली यांनी या घटनेची सबिताच्या कुटूंबियांना माहिती देण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, मारुफ व सबिता रिलेशनशिपमध्ये होते. मारुफ एक ट्यूनिशियन नागरिक असून, त्याचा आमच्याकडे कोणताही पत्ता नाही. प्रकरणाचा तपास सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...